म्हैसपालन करताना भरपूर दुधासाठी कोणत्या जातीची म्हैस घ्यावी? जाणून घ्या सविस्तर मार्गदर्शन

Published on -

सध्या समाजाकडे नीट पाहिले तर लक्षात येईल की सध्या तरुणांना नोकऱ्या राहिलेल्या नाहीत. अनेक तरुण बेरोजगार झालेले आहेत. त्यामुळे अनेक तरुण सध्या दुग्ध व्यवसायाकडे वळत आहे. सध्या हा व्यवसाय वाढताना दिसत आहे.

शेतकरी देखील जोडधंदा म्हणून पहिल्यापासूनच हा व्यास करत आहे. परंतु आता तरुण वर्ग देखील या व्यवसायकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. जर तुम्ही देखील डेअरी बिझनेस सुरु करण्याचा विचार करत असाल किंवा जर दुग्ध व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी ठरेल.

पशुतज्ज्ञांनी दूध उत्पदकांना म्हैस पालन करण्याचा सल्ला दिलाय. ते याला काळे सोने असेही म्हणतात. यातून भरपूर उत्पन्न आपण घेऊ शकतो. परंतु तज्ञांच्या मते यासाठी नीली रावी जातीचे म्हशींचे पालन करावे. याचे अनेक फायदे आहेत. चला जाणून घेऊयात –

कुठे मिळते ही जात
या नीली रावी जातीच्या म्हशींचा उगम पाकिस्तानातील मिंटगुमरी येथे पाहायला मिळतो. सध्या या म्हशी प्रामुख्याने पंजाबच्या भागात आढळतात. पंजाब आणि आसपासच्या भागात याला पंचकल्याणी असेही म्हणतात. या म्हशी प्रचंडन दूध देतात. एका वेताला सुमारे सरासरी 1600-2000 लिटर दूध देते, व याची फॅट साधारण 7 टक्के असते असे सांगितले जाते.

७० हजरांपर्यंत आहेत किमती
नीली रावी जातीच्या म्हशी जास्त दूध देत असल्याने त्यांच्या किमती देखील जास्त आहेत. बाजारात या जातीच्या म्हशीची किंमत 25 हजार ते 70 हजार रुपयांपर्यंत आहे. परंतु त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेमुळे पैसे वसूल होतात.

अशा पद्धतीने पारख करा
– नीली रावी म्हशी दिसायला एकदम जाड, भरभक्कम असतात. रंग अगदी काळाकुळकुळीत असून शिंगे देखील भरभक्क्म असतात.

– पांढऱ्या रंगाची खून : त्यांच्या शरीरावर पाच ठकाणी पंडहरा रंग पाहायला मिळतो. या म्हशींच्या कपाळावर पांढरा रंग असतो. तसेच नाक आणि पायांवर देखील पांढरे रंग दिसतील. शेपटी लॅब असून खालचा भाग पांढरा असतो. त्यांचे डोळे निळे आहेत आणि पापण्या मात्र पांढऱ्या असतात.

– भारताव्यतिरिक्त बांगलादेश, चीन, फिलिपाइन्स, श्रीलंका आणि ब्राझीलमध्येही या म्हशी पाळल्या जातात. या जातीच्या म्हशीचे सरासरी वजन 450 किलो असते.

खुराकाची घ्या काळजी
या म्हशींच्या खुराकाची विशेष काळजी घ्यावी. विविध प्रकारचा खुराक द्यावा. या जातीच्या म्हशींना प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए असलेले पूरक आहार द्याया.

मका, गहू, जव, ओट, बाजरीचे दाणे, शेंगदाणे, तीळ, सोयाबीन, मोहरी, सूर्यफुलाच्या बिया, गव्हाचा कोंडा आदींचा वापर खुराकात आपण करू शकता. यातून भरपूर दूध उत्पादन घेऊन पैसे कमाऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe