Honda CB350 bike : वाहन क्षेत्रामधील प्रसिद्ध, पॉवरफुल कंपनी कोणती? असा प्रश्न विचारल्यास तुमच्या डोळ्यासमोर पहिले नाव येते ते म्हणजे Honda. टुव्हीलर असो की फोरव्हीलर ही कंपनी एकदम उत्कृष्ट वाहने बनवते. आजवर होंडाने एकदम भारी भारी दुचाकी लॉन्च केल्या.
परंतु आता यावेळेस थेट 350cc चीच बाईक लॉन्च केलीये. या बाइकचे नाव आहे Honda CB350 . आज लॉन्च झालॆली ही बाईक आता 350cc सेगमेंट मधील बाइक्सना टक्कर देईल. ही बाईक 2 व्हेरिएंटमध्ये लॉन्च झाली असून या बाईकची किंमत 2 लाख रुपये आहे.
* Honda CB350 मधील इंजिन व पॉवर
या बाइकमध्ये पॉवरफुल इंजिन असेल यात शंकाच नाही. यातील इंजिन हे 348.36 सीसी एअर कूल्ड, 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर असेल. हे इंजिन 5,500 RPM वर 15.5 किमी कमाल पॉवर आणि 3000 rpm वर 29.4 nM टॉर्क जनरेट करते.
विषेश म्हणजे या बाइकमध्ये तुम्हाला 5 गिअर मिळतील. यावरूनच बाईकचा वेग किती असेल याचा अंदाजा आला असेलच.
* फीचर्स
यातील फिकेचर्स जर आपण पहिले तर यामध्ये गोल एलईडी हेडलॅम्प, एलईडी विंकर्स एलईडी टेललॅम्प असतील याने बाईकचा लूक एकदम आकर्षक होऊन जाईल. याशिवाय सोबतच स्प्लिट सीट ऑप्शन, डिजिटल अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर होंडा स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टम असिस्ट, ड्युअल चॅनल ABS आणि स्लिपर क्लच देखील असणार आहे. याने बाईकची उंची व स्पीड भन्नाट वाढेल.
किंमतही तितकीच पॉवरफुल
कंपनीने ही बाइक CB350 DLX व CB350 DLX Pro या दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे. CB350 DLX ची किंमत 1,99,900 रुपये तर CB350 DLX Pro ची किंमत 2,17,800 रुपये आहे. यावर 10 वर्षांची वॉरंटी पॅकेज असून ही बाईक प्रेशियस रेड मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक,
मॅट क्रस्ट मेटॅलिक, मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक आणि मॅट ड्यून ब्राउन या कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध होणार आहे. या बाईकची बुकिंग सुरु असून लवकरच याची डिलिव्हरी देखील सुरु होईल. ही बाईक तरुणांच्या अगदी पसंतीस उतरेल अशी कंपनीला आशा आहे.