Dan Bilzerian : जगात अनेक तर्हेवाईक लोक राहतात. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पैसे कमवत असतो. कुणी नोकरी करून तर कुणी बिझनेस करून. प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. परंतु असा एक व्यक्ती आहे की त्याने जुगारातून अरबो रुपये कमावले आहेत.
आणि आता तर त्याला चक्क जुगाराचा राजा असेही म्हटले जाते. त्या व्यक्तीच नाव बहुतांश लोकांना माहीतही असेल. तो आहे पोकर किंग अर्थात डॅन बिझेरियन. याची स्टोरी इंटरेस्टिंग आहे. याने यातून कोट्यवधींची नेटवर्थ उभी केली आहे.
थोडस जाणून घेऊयात डॅन बिझेरियन विषयी –
डॅन बिलझेरियनका जन्म 7 डिसेंबर 1980 रोजी अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे झाला. तो एक पोकर खेळाडू, बिझनेसमन, अभिनेता आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून आज काम करतो. डॅनचे वडील अमेरिकेतील खूप मोठे बिझनेस असलयाने त्याची लाईफ लहानपणापासूनच ऐषोआरामात गेली.
एकदा त्याच्या एका चुकीमुळे तो ज्या शाळेत होता तेथून त्याला काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्याने दुसरीकडे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. व तेथेच त्या पोकर विषयी माहिती मिळाली. तेथे त्याने पोकर अर्थात जुगार खेळणे सुरु केले.
डॅनने सुरुवातीला या जुगारात सांगेल पैसे गमावले. त्याने मग पैशांसाठी त्याच्या वडिलांच्या बंदुकाही विकल्या, एके दिवशी त्याने जुगार खेळताना $10,000 जिंकले, त्यानंतर तो थेट लास वेगासला गेला. येथे त्याने मोठ्या स्तरावर पोकर खेळायला सुरुवात केली.
एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, एका रात्रीत डॅनने या $10,000 मधून जवळपास $1,87,000 जिंकले होते. त्यानंतर त्याने यावरच लक्ष केंद्रित केले. असे म्हणतात की डॅनने 2013 मध्ये एकदा सुमारे 11 मिलियन डॉलर्स कमावले होते. त्यानंतर तो खूपच चर्चेत आला.
कोठून कुठून येतो पैसा
जर आपण डॅन बिल्झेरियनचे इन्कम सोर्स पाहिले तर त्याचे बहुतांश उत्पन्न हे पोकर खेळण्यामधून येते. याशिवाय डॅनचे अनेक प्रकारचे बिझनेस असून त्यातून त्याची करोडोंची कमाई होते. त्याची स्वतःची Ignite International Brands Ltd ही कंपनी देखील आहे. तो स्वतः सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असल्याने तेथूनही तो चांगले पैसे कमावतो.
310 मिलियन डॉलरची एकूण संपत्ती
आता हा एकदा ऐकून मात्र तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. कारण त्याची एकूण संपत्ती अर्थात टोटल नेट वर्थ 310 मिलियन डॉलर अर्थात 2500 कोटी रुपये आहे.