किरकोळ वाद झाला अन जन्माला आली छोटीसी बिझनेस आयडिया, त्यातून उभी राहिली करोडोंची OLA कंपनी..वाचा थक्क करणारी यशोगाथा

Success story : एक काळ होता घरातूनबाहेर पडायच्या आधी दहा वेळा विचार करायला लागायचा. बाहेर कसे जायचे? काय साधने भेटतील? साधने भेटतील की नाही? आदी प्रश्न मनात यायचे. त्यामुळे कोठे निघताना भरपूर प्लॅनिंग करायला लागायचं.

परंतु आता बाहेर पडताना कसलाही विचार न करता बाहेर पडत येते. याचे कारण असे की कुठेही गेले तरी पटकन मोबाईल बाहेर काढून ओला अँप ओपन करून कॅब बुक करतो. की लगेच पुढील प्रवासाला सुरवात. आज OLA ने भरपूर मार्केट कव्हर केले आहे,

प्रवास सोपा केला आहे. OLA ने भारतातील 60 टक्के कॅब मार्केट काबीज केलं आहे. परंतु ही OLA कशी स्थापन झाली? यामागे किती संघर्ष आहे? भावेश अग्रवाल यांची OLA उभी करण्यामागची यशोगाथा थक्क करणारी आहे. चला जाणून घेऊयात –

* भाडे कमी करण्यावरून झाला वाद अन उभी राहली कंपनी

भाविश अग्रवाल आयआयटीचे विद्यार्थी होते. 2010 मध्ये ते एकदा काही कामासाठी कॅबमध्ये जात होते. तेव्हा कॅब चालकाने त्याच्याकडे जास्त भाडे मागितले. भाविश आणि कॅब ड्रायव्हरमध्ये जोरदार वादावादी झाली. यावेळी भाविश यांच्या मनात आले की मला ही समस्या जाणवली तर मग देशभरात ही समस्या अनेकांना जाणवत असेल.

यावर काहीतरी उपाय असला पाहिजे. याच कल्पनेतून त्यांनी स्वतःची कॅब कंपनी स्थापन करण्याबाबत विचार केला, व त्यांचा मित्र अंकित भाटी यासोबत त्यांनी कंपनी स्थापन केली. त्यानंतर त्यांनी इन्वेस्टर्स शोधण्यास सुरवात केली. त्यांनी भरपूर प्रयत्न केले व 32 हजार करोड़ रुपये फंडिंग जमा केले.

* आज 60 टक्के कॅब मार्केट केले काबीज

प्लॅनिंगनुसार अॅप लाँच केले गेले. अल्पावधीतच हे अॅप लाखो लोकांनी डाउनलोड केले. आज कंपनीने भारतातील 60 टक्के कॅब व्यवसाय काबीज केला आहे. या बिझनेस सेट करून भरपूर पैसे त्यांनी कमवले. पण ते इतक्यात थांबले नाहीत त्यांनी आता इलेक्ट्रिक व्हेईकल मध्ये आपले पाऊल टाकले.

* EV साठी वेटिंग

बदलत्या काळाचा विचार करून भाविश यांनी इलेक्ट्रिक व्हेईकल मध्ये आपले पाऊल टाकले. इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्याआधी त्यांनी प्री-बुकिंग मिळवले. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुरवातीला तर 6 ते 7 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी स्कुटरसाठी होता. अशा पद्धतीने एका वादातून जन्म घेतलेली बिझनेस आयडिया आज सक्सेसफुल कंपनीच्या रूपात समोर उभी आहे.