अवघ्या काही वर्षांत पैसे दुप्पट करणाऱ्या ‘या’ आहेत पोस्टातल्या 3 जबरदस्त सरकारी स्कीम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Govt Scheme : पैशांची बचत हीच उद्या पैशांची गरज भागवणार आहे. कारण आपैसे कुणी फुकट देत नाही. आज आपण कामम करतो म्हणून पैसे मिळतात. परंतु भविष्यात ज्यावेळी काम थांबेल त्यावेळी काय?

त्यावेळी तुमची आज केलेली गुंतवणूक तुम्हाला फायद्याची ठरेल. परंतु बऱ्याचदा पैसे कुठे गुंतवावेत असा प्रश्न पडतो. कारण पैसे हे विश्वासार्ह ठिकाणीच गुंतवले पाहिजेत.

आज आम्ही तुम्हाला सरकारी स्कीम सांगणार आहोत कि ज्यात तुमचे पैसे अवघ्या काही वर्षात डबल होतील. सरकारी योजना असल्याने पैसे बुडणार नाहीत. या योजना पोस्ट ऑफिस चालवते. या योजनेत तब्बल 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्यास तुम्हाला मिळेल.

* व्याजदरांविषयी थोडेसे –

पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या रकमा, विविध कालावधी आणि व्याजदर यानुसार अनेक योजना आहेत. यापैकी, अशा काही योजना आहेत ज्या त्यांच्या गुंतवणूकदारांना 9 टक्क्यांपर्यंत व्याज देतात.

आज येथे आपण 7.70 टक्के, 8 टक्के आणि 8.20 टक्के व्याजदराचा लाभ देणाऱ्या तीन योजना पाहू. यात तुमचे पैसे काही वर्षांत डबल होतील.

* राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही जबरदस्त स्कीम आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास, गुंतवणूकदाराला वार्षिक 7.70 टक्के व्याजदराचा लाभ मिळू शकतो. ही योजना आयकर कलम 80C अंतर्गत येते. त्यामुळे तुमची बचतही होते. पैसेही वाढतात व आयकर देखील वाचतो.

* ज्येष्ठ नागरिक बचत योजना

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही पोस्ट ऑफिसच्या विशेष योजनांपैकी एक आहे. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. यामध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपये जमा करता येतील. या योजनेत खातेदारांना दर तीन महिन्यांनी व्याजाचा लाभ दिला जातो. यामध्ये तब्बल 8.20 टक्के व्याजदर मिळतो. म्हणजेच अवघ्या काही वर्षांत तुमचे पैसे डबल होतील.

* सुकन्या समृद्धी योजना

ही खास करून मुलींसाठी स्कीम आहे. त्यांच्या भविष्याची अर्थात लग्न व शिक्षण यासंदर्भात गुंतवणुकीसाठी ही योजना आहे. यामध्ये एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंत पैसे जमा करता येतात. या योजनेअंतर्गत उघडलेले खाते मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत सुरू असते.

यामध्ये मुलीने 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर शिक्षणासाठी खात्यातून 50 टक्के रक्कम काढू शकता. काढण्याची मुभा देण्यात आली आहे. या योजनेत 8 टक्के वार्षिक व्याज मिळते. ही सध्याची लोकप्रिय योजना आहे. जर तुमची मुलगी पाच वर्षांची असेल आणि तुम्ही वार्षिक फक्त 20 हजार रुपये जरी गुंतवले तरी मॅच्युरिटीला तुम्हाला 8 लाख 97 हजार 938 रुपये मिळतील.