मागील काही महिन्यांचा काळ पहिला तर कार सेक्टर तेजीत आहे. आज प्रत्येकाला स्वतःची कार असावी असे वाटते. तसे स्वप्न ते बाळगून असतात. विशेष म्हणजे ईएमआय असेल किंवा फायनान्स असेल यामुळे कार घेणेही सोपे झाले आहे.
मागील काही आकडेवारी पाहिली तर लोकांचा कल याकडे जास्त प्रमाणात वळत आहे. याचाच फायदा घेण्यासाठी व तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक कार उत्पादक कंपन्या डिसेंबर 2023 मध्ये आणि नवीन वर्ष 2024 च्या सुरुवातीला
अनेक शानदार वाहने लॉन्च करणार आहेत. यामध्ये एंट्री लेव्हल, हॅचबॅक आणि एसयूव्हीसह अनेक सेगमेंटमधील कार चा समावेश आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊयात –
* यात प्रथम पाहू किआ सोनेट
किआ मोटर्स कंपनी आपल्या सोनेट या मिड-सेगमेंट सब-कॉम्पॅक्ट कारचे नवीन व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार डिसेंबरच्या अखेरीस किंवा 2024 च्या सुरुवातीला लाँच केली जाईल. नवीन किआ सोनेटचा फ्रंट लूक जसे ग्रिल, हेडलॅम्प मध्ये बदल केला जाऊ शकतो.
डिजिटल डिस्प्लेसह टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिमचा देखील यात समावेश असणार असल्याची माहिती आहे. यात व्यवस्थित जागेसाठी 392 लीटर बूट स्पेस असेल. 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि टर्बो इंजिन असे ऑप्शन देखील यात मिळतील.
* लवकरच येतेय Tata Punch EV
टाटा कंपनीची एक वेगळीच क्रेझ आहे. टाटा आता त्याच्या पंच या कारचे EV व्हर्जन आणत आहे. ही शानदार कार फेब्रुवारी 2024 च्या मध्यापर्यंत लॉन्च होईल. कंपनीने अद्याप याची किंमत जाहीर केलेली नाही. परंतु साधारण अंदाजे याची प्रारंभिक किंमत 12 लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याची चार्ज रेंज देखील मोठी असणार आहे. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही कार 315 किलोमीटरपर्यंत धावेल. सेफ्टी फीचर्ससाठी यात एअरबॅग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम असणार आहे.
* आगामी दिवसात आणखी कोणत्या कार लॉन्च होतील ?
या वरील कार व्यतिरिक्त आणखीही काही कार लॉन्च होणार आहेत. यात ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट, लेक्सस LM 2023, महिंद्रा थार ही देखील लॉन्च होणार आहे. यात 5 दरवाजे असणार आहेत. यासोबतच टाटा कर्वेव्ह, मारुती सुझुकी eVX, मर्सिडीज-बेंझ EQA आदी कार देखील लॉन्च होतील.