Ahmednagar City News : नगरच्या एमआयडीसीतील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेजवळ एकास मारहाण करत लुटण्यात आले. ही घटना १६ नोव्हेंबर रोजी घडली.
चोरट्याने ३ लाख रुपयांची रोकड, बँकेचे पासबुक, क्रेडिट कार्ड, आधार कार्ड आदी वस्तू चोरुन नेल्या. या प्रकरणी आशिष जयप्रकाश पांडे यांनी फिर्याद दाखल केली. फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Ahmednagar City News
फिर्यादी आशिष पांडे हे एमआयडीसीतील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेजवळून मोटारसायकलवर जात होते. यावेळी विनानंबरच्या मोटारसायकलवर दोघे इसम तेथे आले. त्यांनी दांडक्याने फिर्यादीस मारहाण करत
त्यांच्याकडील ३ लाखाची रोख रक्कम चोरुन पोबारा केला. या प्रकरणी एमआयडीसीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई. पाठक पुढील तपास करत आहेत.