Petrol Pump Business:- बरेच व्यक्ती अनेक प्रकारचे व्यवसाय करतात बरेच व्यक्ती व्यवसायाच्या शोधात असतात. जर शिक्षणातून पदवी घेणाऱ्यांचे प्रमाण म्हणजे सुशिक्षित तरुणांचे प्रमाण आणि उपलब्ध नोकऱ्यांचे प्रमाण पाहिले तर ते व्यस्त असल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांकडे वळणे हे काळाची गरज आहे. अनेक सुशिक्षित तरुण आता वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करून आयुष्यामध्ये स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. कुठलाही व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे त्याची एक वेगळ्या पद्धतीची वैशिष्ट्यपूर्ण अशी प्रोसेस येते व ती प्रोसेस फॉलो करणे खूप गरजेचे असते. तेव्हाच व्यवसाय उभारता येतो आणि तो यशस्वी देखील करता येतो.
अगदी याच पद्धतीने बऱ्याच जणांची पेट्रोल पंप व्यवसायात पडण्याची इच्छा असते. परंतु पेट्रोल पंपाची डीलरशिप किंवा पेट्रोल पंपाचे मालक आपल्याला कसे होता येते याविषयी पुरेशी माहिती नसते. त्यामुळे आपण या लेखांमध्ये इंडियन ऑइल पेट्रोल पंपाची डीलरशिप कशी घेतली जाते व त्यासाठीची पात्रता किंवा इतर आवश्यक माहिती या लेखामध्ये बघणार आहोत.
इंडियन ऑइल पेट्रोल पंप डीलरशिप
आज जर आपण भारताचा विचार केला तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अनेक पेट्रोल पंप आपल्याला रस्त्यांवर दिसून येतात. साधारणपणे 1000 पेक्षा जास्त पेट्रोल पंप या कंपनीच्या माध्यमातून चालवले जात असून त्यामध्ये अजून वाढ करण्याची कंपनीची योजना आहे.
लोकसंख्येची गरज पाहता कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 200 पेक्षा जास्त पेट्रोल पंप उघडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे ज्यांना पेट्रोल पंप व्यवसाय करायचा आहे आणि भरपूर पैसा मिळवायचा आहे अशा लोकांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
इंडियन ऑइल पेट्रोल पंप डीलरशिप साठीची पात्रता
पेट्रोल पंप डीलरशिप घ्यायची असेल तर यामध्ये सरकारचे अनेक नियम व कायदे येत असतात. या मुद्द्याला धरून जर आपण पाहिले तर डीलरशिप साठी 2019-20 च्या जाहिरातीमध्ये सर्व श्रेणीकरिता सर्व प्रकारचा वित्त पुरवठ्याच्या अटी रद्द करण्यात आलेले आहेत आणि जमा होणारी सुरक्षा देखील रद्द करण्यात आलेली आहे.
तसेच यामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यात आले असून स्वातंत्र्य सैनिकांना देखील काही प्रमाणात सूट मिळते. यासोबतच तुम्हाला पेट्रोल पंप डीलरशिप घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचे वय किमान 21 ते कमाल 55 वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या डीलरशिप करिता तुम्ही कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शहरामध्ये जर पेट्रोल पंपाची डीलरशिप घ्यायची असेल तर बारावी पास असणे गरजेचे आहे.
पेट्रोल पंप डीलरशिपसाठी स्थानाची निवड आवश्यक
समजा तुम्हाला शहरी भागामध्ये पेट्रोल पंपची डीलरशिप घ्यायची असेल तर त्याकरिता तुम्हाला कमीत कमी आठशे स्क्वेअर फुट जागेची गरज असते. तसेच कुठल्याही महामार्गावर पेट्रोल पंप डीलरशिपसाठी तुम्हाला बाराशे चौरस फुट ते सोळाशे चौरस फूट जागा लागते.
जर तुम्ही जमीन भाडेतत्त्वावर घेतली असेल तर त्यासाठी देखील काही नियम आहेत. जसे की तुम्ही सुरू करत असलेल्या पेट्रोल पंपाची जमीन सपाट आणि विकसित केलेली असणे गरजेचे आहे. तसेच त्या ठिकाणी पाण्याची तसेच विजेची सोय असणे देखील महत्त्वाचे आहे.
पेट्रोल पंप डीलरशिपसाठी किती लागते गुंतवणूक?
जर तुम्हाला इंडियन ऑइल पेट्रोल पंपाची डीलरशिप घ्यायची असेल तर तुमच्याकडे 70 ते 80 लाख रुपये असणे गरजेचे आहे. यासह जमिनीचे स्थान हे तुमच्यावर अवलंबून असते. म्हणजेच तुम्ही जमीन भाड्याने घेत आहात की तुमची स्वतःची जमीन आहे यावर देखील भांडवल ठरते. तुम्ही पेट्रोल पंप उघडल्यास याकरिता सरकारी एजन्सीची कायदेशीर मान्यता घेणेदेखील गरजेचे आहे. यासाठी परवाण्यासोबतच तुम्हाला कर नोंदणी अनिवार्य आहे.
इंडियन ऑइल पेट्रोल पंप डीलरशिप साठी कसा करावा अर्ज?
1- पेट्रोल पंप डीलरशिप करिता सगळ्यात अगोदर तुम्हाला https://iocl.com या संकेतस्थळावर जाऊन होम पेज उघडल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला इंडियन ऑइल फॉर यू आणि इंडियन ऑइल फॉर बिजनेस पार्टनर इत्यादी पर्याय दिसतात.
2- या ठिकाणी एक फॉर्म असतो त्या फॉर्मच्या माध्यमातून सगळे व्यवसाय विषयाची माहिती भरली जाते त्यानंतर हे चौकशी संपूर्ण भरल्यानंतर तो फॉर्म तुम्हाला सबमिट करावा लागतो.
3- फॉर्म सबमिट केल्यानंतर ही सर्व माहिती कंपनीकडे जाते. कंपनीकडून संपूर्ण वेरिफिकेशन होऊन कंपनी तुमच्याशी संपर्क साधते.
पेट्रोल पंप डीलरशिप साठी कर्ज मिळते का?
तुम्हाला देखील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाची डीलरशिप घ्यायची असेल तर तुमच्याकडे पुरेशी रक्कम नसेल तर तुम्ही याकरिता भारत सरकारच्या माध्यमातून कर्ज देखील घेऊ शकता.
या व्यवसायात किती मिळतो नफा?
इंडियन ऑइल पेट्रोल पंप डीलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला खूप चांगले फायदे मिळतात. कारण पेट्रोल पंप हे 24 तास चालतात. त्यामुळे कमाई देखील चांगली होते व नफा देखील चांगला मिळतो. साधारणपणे पेट्रोल वर तुम्हाला एक लिटर वर दोन ते पाच रुपये नफा मिळतो व डिझेलवर १.८० ते २.४० रुपये प्रति लिटर नफा मिळतो.
या व्यवसायात जोखीम आहे का?
पेट्रोल पंप डीलरशिप घेऊन पेट्रोल पंपाचा व्यवसाय सुरू केला तर यामध्ये कुठल्याही प्रकारची जोखीम किंवा धोका नाही. हा अशा प्रकारचा व्यवसाय आहे की यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जोखीम किंवा धोका पत्करावा लागत नाही. हा व्यवसाय संपूर्ण बाराही महिने व पूर्ण आठवडा, व दिवसातील संपूर्ण 24 तास चालतो. त्यामुळे कुठल्याही टेन्शन शिवाय तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.