लॉन्च झाला जबरदस्त फंड ! बजाज फिनसर्व्ह बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड देईल सुरक्षित कमाईची संधी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत. आजकाल गुंतवणुकीचे महत्व सर्वानाच पटू लागले असल्याने गुंतवणुकीचे पर्यायही अनेक खुले झाले आहेत.यामध्ये जास्त रिटर्न देणारे पर्याय देखील आहेत. परंतु त्यात रिस्क फार असते. त्यामुळे अलीकडील काळात कमी रिस्क असणारा व जास्त रिटर्न देणारा पर्याय म्हणून म्युच्युअल फंड कडे पाहिले जाते.

आता मार्केटमध्ये बजाज फिनसर्व्ह अॅसेट मॅनेजमेंटने बजाज फिनसर्व्ह बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड (BAF) लाँच केला आहे. हा एक ओपन-एंडेड डायनॅमिक अॅसेट अॅलोकेशन फंड आहे. ज्या लोकांना इक्विटीशी संबंधित ऑप्शन किंवा फिक्स इन्कम संबंधित पर्यायांमध्ये पैसे गुंतवायचे आहेत त्यांच्यासाठी हा फंड जबरदस्त आहे. चा त्याबद्दल जाणून घेऊयात

BAF मधील गुंतवणुकीविषयी माहिती

यातील गुंतवणुकीसाठी तुम्ही इच्छुक असाल व यासाठी अर्ज करायचं असेल तर किमान रक्कम रु 500 आहे. हा नवीन फंड ऑफर सब्सक्रिप्शन साठी 24 नोव्हेंबर रोजी खुला होणार आहे. त्यानंतर तो 8 डिसेंबर 2023 रोजी बंद होईल. त्यानंतर पुन्हा एकदा ऑन-गोइंग आधारावर सब्सक्रिप्शन साठी 18 डिसेंबर 2023 रोजी पुन्हा एकदा खुला होईल.

एसेट अलोकेशनचे ‘असे’ असेल नियोजन

मालमत्ता वाटप धोरण ठरवण्यासाठी मूलभूत तत्त्वे, मागील कामगिरी आणि क्वांटिटेटिव मॉडल आदी गोष्टी महत्वाच्या असणार आहेत. दरम्यान बजाज फिनसर्व्ह AMC ​​मधील जी टीम आहे ती योग्य वेळी मालमत्ता वाटप आणि गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी व्यवहार विज्ञान मॉडल वापरण्यावर विश्वास ठेवते. असे म्हटले जात आहे की, हा असा पहिलाच फंड आहे की जो व्यवहार विज्ञान मॉडलवर आधारित असणार आहे.

एकदंरीतच हा नवीन लॉन्च झालेला फंड मार्केटमध्ये जबरदस्त रिटर्न देण्याच्या हिशोबाने एकदम व्यवस्थित आहे. त्याचे असणारे नियोजन, प्लॅनिंग, गुंतवणूक धोरण,एसेट अलोकेशनची स्ट्रॅटेजी आदींमुळे हा फंड नक्कीच समाधानकारक कामगीरी करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe