सहा ग्रामपंचायत कार्यालयांच्या बांधकामासाठी निधी मंजूर – आमदार प्राजक्त तनपुरे

Ahmednagarlive24 office
Updated:
Ahmednagar News

Ahmednagar News : महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघातील सहा ग्रामपंचायत कार्यालयांच्या नवीन इमारत बांधकामांसाठीचा प्रस्ताव तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजुर केला होता; मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या गतिमंद सरकारने या कामासाठी विलंब लावला.

सातत्याने पाठपुरावा करून आता या ६ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राहुरी तालुक्यातील केंदळ बु, तांभरे, पाथर्डी तालुक्यातील शिराळ, कोल्हार व आडगाव तसेच नगर तालुक्यातील जेऊर गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालयास १ कोटी ८ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

याबाबत पत्रकात आमदार तनपुरे यांनी सांगितले, की सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात मा बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी या योजनेअंतर्गत कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय बांधण्यास शासनाने संदर्भीय शासन निर्णयान्वये सोबतचे परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या ग्रामपंचायतींना मंजुरी प्रदान केलेली आहे,

यानसार प्रत्येक ग्रामपंचायतीचा हिस्सा ३ लाख ६० हजार व शासनाचे १४ लाख ४० हजार एकुण १८ लाख रुपये खर्चाचे बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार राहुरी तालुक्यातील केंदळ बु, तांभरे, पाथर्डी तालुक्यातील शिराळ, कोल्हार, व आडगाव व नगर तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे कामास मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी या योजनेंतर्गत कार्यालयास स्वतःची इमारत नाही, ग्रामपंचायत कार्यालय बांधकामास परेशी जागा उपलब्ध असुन या जागेवर इमारत बांधकामास इतर कायदेशीर अडचणी नाही, सदर ग्रामपंचायतीस या किंवा अन्य योजनेतुन ग्रामपंचायत कार्यालय मंजुर नाही,

लोकसंख्येच्या टप्याप्रमाणे शासनाने निश्चित केलेल्या मुल्यानुसार सदर ग्रामपंचायत स्व-निधी खर्च करण्यास तयार असुन त्याबाबतचा संबधित ग्रामपंचायतींने ग्रामसभा ठराव संमत केलेला आहे व संबधित ग्रामपंचायतीची लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार) या निकषांची पुर्तता करीत असलेबाबत गटविकास अधिकारी यांनी सादर केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe