Healthy Diet : मधुमेह असलेल्या रुग्णांना आपल्या आहाराची विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे. या आजारात खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी न घेतल्याने रुग्णाच्या समस्या आणखी वाढतात. अशातच बरेच रूग्ण अनेकदा काय सेवन करावे आणि काय टाळावे याबद्दल संभ्रमात राहतात.
सध्याच्या खराब जीवनशैलीमुळे येत्या काही वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक मधुमेह रुग्ण असलेला देश असेल. या आजाराचे सर्वात मोठे कारण असंतुलित आहार. म्हणूनच आहाराशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. अशातच मधुमेहामध्ये कांदा खावा की नाही याबाबतही अनेकांच्या मनात संभ्रम असतो. याच प्रश्नाचे उत्तम आम्ही घेऊन आलो आहोत.

-कांदा जवळपास प्रत्येक घरात वापरला जातो. विविध प्रकारचे पदार्थ बनवण्याबरोबरच ते सलाड म्हणूनही वापरले जाते. कांद्यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे, आयुर्वेदात औषध म्हणूनही त्याचा वापर केला जातो. कांद्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर आणि व्हिटॅमिन सी यांसारखे शरीरासाठी फायदेशीर घटक पुरेशा प्रमाणात असतात. कांद्यामध्ये सोडियम, प्रथिने, कार्ब्स, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन ए आणि फोलेट इत्यादी पुरेशा प्रमाणात असतात.
-यात अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण पुरेशा प्रमाणात असते. शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी त्याचे सेवन खूप फायदेशीर ठरते. याशिवाय कांदा खाल्ल्याने तुमच्या शरीरातील आजारांपासून बचाव होतो. रोगप्रतिकारशक्तीही वाढते. वाढते आणि शरीर संक्रमण इत्यादींशी लढण्यास सक्षम होते.
मधुमेहामध्ये कांदा खाण्याचे फायदे :-
कांद्याचे सेवन मधुमेहामध्ये खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असल्याने शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. मधुमेह असल्यास कांदा खाण्याचे काही प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत :-
-पचनसंस्थेसाठी फायदेशीर.
-वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
-मूत्रमार्गाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त.
-शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी फायदेशीर.
-डोळ्यांसाठी फायदेशीर.
-शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर.
-हृदय निरोगी ठेवा.
मधुमेहाच्या समस्येमध्ये कांद्याचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. तथापि, ते नेहमी संतुलित प्रमाणात सेवन केले पाहिजे. मधुमेहाचे रुग्ण अनेक प्रकारे कांद्याचे सेवन करू शकतात. सकाळी किंवा दुपारी सलाड म्हणूनही खाऊ शकता.