Mhada News: छत्रपती संभाजी नगरमध्ये उभा राहणार म्हाडाचा 4500 घरांचा मोठा प्रकल्प? घरांचे स्वप्न होईल पूर्ण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News:- स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सिडको आणि म्हाडा या गृहनिर्माण संस्थांची खूप महत्त्वाची भूमिका असून मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी म्हाडाचे अनेक प्रकल्प सुरू आहेत व सध्या काही प्रकल्पांच्या माध्यमातून सोडत प्रक्रिया देखील सुरू आहे.

स्वतःचे घर असावे ही इच्छा पूर्ण करण्यासाठी बरेच जण पैशांची जुळवा जुळव करत असतात. अशा व्यक्तींसाठी म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते. याच पद्धतीने जर तुम्हाला देखील संभाजीनगर मध्ये घर घ्यायची इच्छा असेल तर संभाजीनगरमधील ऑरिक सिटी या ठिकाणी म्हाडाचा मोठा प्रकल्प उभा राहणार असून त्यासाठीचा प्रस्ताव देखील मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांपुढे सादर केला जाणार आहे.

ऑरिक सिटीमध्ये उभा राहणार म्हाडाचा साडेचार हजार घरांचा प्रकल्प

याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगरच्या ऑरिक सिटी या ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून चार हजार पाचशे घरांचा  प्रकल्प उभारला जाणारा असून त्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांकडे देखील सादर केला जाणार आहे अशी माहिती अतुल सावे यांनी दिली आहे.

या ठिकाणी असलेला हा म्हाडाचा प्रकल्प अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी प्रस्तावित आहे. यासाठी साडेचार हजार घरे बांधण्याची प्लॅनिंग ठेवण्यात आलेली असून या प्रकल्पामध्ये वीज, रस्ते तसेच पाणी आणि ड्रेनेज अशा पायाभूत सुविधा तयार असल्यामुळे कामगार वसाहतीकरिता  हा प्रकल्प म्हाडाला खूप फायद्याचा असेल असे देखील सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर या प्रकल्पाचा प्रस्ताव हा मार्गी लावण्यात येईल अशी देखील माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. ऑरिक सिटीमध्ये नागरी वसाहतींसाठी  विकसित जमीन असल्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून संबंधित 7.50 हेक्टर जमीन विकत घेण्यात येणार आहे व त्यानंतर अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील कामगारांसाठी इथे एक स्मार्ट सिटी उभारण्यात येईल.

या पद्धतीचे प्लॅनिंग असून या धर्तीवर म्हाडाच्यावतीने शासनाची पत्रव्यवहार झाल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून कोणत्या भागात सोडत काढण्यात येईल व यामध्ये कोणाचे नशीब चमकेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.