Ahmednagar News : बापाच्या डोळ्यादेखत पोटचा गोळा बिबट्याने उचलला, तीन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

bibatya

Ahmednagar News :  हसतखेळत शेताकडून घराकडे चाललेल्या वेदिका ढगे या तीन वर्षीय चिमुकलीवर गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. जखमी वेदिकाला तात्काळ उपचारासाठी अहमदनगरला हलवले पण उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. ही घटना राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे गुरुवारी सकाळी घडली.

सकाळी आठ वाजताच्या सुमारास वेदिका ही आपल्या राहत्या घरी अंगणात खेळत होती. तिचे वडील श्रीकांत व भाऊ सुरेश घराजवळ काही अंतरावर शेतातून भुईमुगाचा पाला आणण्यासाठी गेले. वेदिकाही त्यांच्या मागे नेहमीप्रमाणे शेतात गेली. वडील व भाऊ पाला घेऊन पुन्हा घराकडे येत होते.

यावेळी वेदिकानेही आपल्या डोक्यावर भुईमुगाची दोन तीन झाडे न घेऊन घराच्या दिशेने निघाली. याच वेळी घराजवळील गिन्नी गवतात दबा. धरून बसलेल्या बिबट्याने अचानक 5 चिमुकल्या वेदिकावर हल्ला केला. अन गिन्नी गवतात नेले. तिच्या आवाजाने घरचे धावले.

घरातील इतरांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने चिमुकलीला सोडून तेथून धूम ठोकली. मात्र यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले. परंतु दुर्दैवाने तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

मयत वेदिकाच्या कुटुंबीयांना वनविभागाकडून २५ लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यामध्ये १५ लाखांची एफडी तसेच दहा लाख रुपयांचा चेक काही कागदपत्रे उपलब्ध होताच दोन ते तीन दिवसात ही रक्कम दिली जाणार आहे. घटनेची माहिती नगर येथील उपविभागीय वनविभाग कार्यालयास कळविली आहे अशी माहिती राहुरीच्या वनपालांनी दिली आहे.

दरम्यान आता दुर्घटना घडल्यानंतर वन विभागाने दोन पिंजरे लावले. तालुक्यात पंचवीस ठिकाणी पिंजरे लावले आहेत. मात्र बिबट्याच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. किमान पंचवीस ठिकाणाहून पिंजरे
लावण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.