Monsoon Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मान्सूनच्या मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनता मान्सूनचे आगमन कधी होणार ? हा प्रश्न उपस्थित करत आहेत. मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहिली जात आहे. खरेतर माॅन्सूनचे 19 मेला अंदमानात आगमन झाले.
तेव्हापासून याच्या चर्चा सुरु आहेत. मान्सून केरळात कधी दाखल होणार त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात कधीपर्यंत पोहोचणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत. खरेतर मान्सूनचे अंदमानात आगमन झाले असून मान्सूनचा पुढील प्रवासही जलद गतीने सुरू आहे.
दरम्यान आज मानसून संदर्भात हवामान खात्याने मोठी माहिती दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज मान्सूनने आणखी काही भागात प्रगती केली आहे. एका दिवसाच्या मुक्कानंतर माॅन्सूनची वाटचाल पुन्हा सुरु झाली आहे. तसेचं याच्या पुढील प्रवासाला पोषक हवामान असल्याचे IMD ने स्पष्ट केले आहे.
सध्या कुठे आहे मान्सून
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज अर्थातच 24 मे 2024 ला मान्सूनने मालदीव आणि कोमोरिन भाग, तसेच श्रीलंका, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भागात आणि अंदमान समुद्राचा आणखी काही भाग व्यापला आहे.
Monsoon ने आतापर्यंत अंदमान आणि निकोबारचा संपूर्ण भाग व्यापला आहे. म्हणजे भारतीय हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे मान्सूनचा प्रवास जलद गतीने सुरु असून येत्या काही दिवसात तो भारताच्या मुख्य भूमीत दाखल होणार आहे.
आय एम डी ने आपल्या आधीच्या अंदाजात मान्सूनचे केरळात म्हणजेच भारताच्या मुख्य भूमीत 31 मेला आगमन होणार असे म्हटले आहे. या जाहीर केलेल्या तारखेत तीन-चार दिवस मागे पुढे होऊ शकते.
म्हणजे 28 मे ते 3 जून या कालावधीत कधीही मानसून केरळमध्ये येऊ शकतो. सध्या माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान देखील आहे.
जर असेच हवामान आगामी काही दिवस कायम राहिले तर मान्सून हा हवामान खात्याने सांगितलेल्या वेळेत भारताच्या मुख्य भूमीत दाखल होणार आहे.
IMD ने असे सांगितले आहे की, माॅन्सून पुढील दोन दिवसांमध्ये दक्षिण बंगालचा उपसागर, मध्य बंगालचा उपसागर, ईशान्य बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापणार असा अंदाज आहे.
दुसरीकडे हवामान खात्याने महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील काही भागांमध्ये मान्सून पूर्व वादळी पाऊस होईल तर काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहणार असा अंदाज IMD ने दिला आहे.