Milk Price : ‘असं’ झालं तर दुधाची भाववाढ होईल ! राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितला पर्याय

Ahmednagarlive24 office
Published:
Milk Price

Milk Price : दुधाची दरवाढ हा सध्या गुंतागुंतीचा प्रश्न झाला आहे. दुधाची आवक प्रचंड आहे. दुधाच्या उपपदार्थांचे (दूध भुकटी पावडर, बटर) आंतराष्ट्रीय बाजारात दर कोसळले आहेत. त्यामुळे त्याची निर्यात थांबली आहे. परिणामी दुधाचे दर कोसळले आहेत.

दूध भुकटीच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळाले तर दुधाचे दर वाढतील, त्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत. शासनाने निश्चित केलेला ३४ रुपयांच्या दराबाबत खासगी व सहकारी दूध संघांना सूचना दिल्या आहेत.

मात्र त्यांना दराची सक्ती केली तर दूध संकलनात घट होऊन शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. पूर्वी दुधाची गुणप्रत म्हणजे एसएनएफ (सॉलिट नॉट फॅट) जास्त (८.५) होती.

त्यामुळे दुधातील भेसळीला वाव होता. आता ही गुणप्रत कमी (८.३) करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे भेसळ बंद होऊन दुधाचे दर वाढण्यास त्याची मदत होईल. दुधातील भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाला कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत.

दुधाची भेसळ रोखल्यास दुधाचे भाव वाढण्यास मदत होईल. दुधाची भेसळ रोखण्याबाबत प्रशासनाला कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत, अशी माहिती महसूल तथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी अहमदनगर येथे माध्यमांशी बोलताना दिली.

आरक्षणप्रश्नी दोघांनीही संयमाची भूमिका घ्यावी

मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत जरांगे पाटील- छगन भुजबळ वादाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर विखे पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी सरकार सहमत आहे.

आरक्षण देण्याचा शब्दही सरकारने दिला आहे. त्याची जरांगे पाटील यांनी वाट पाहावी. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी ओबीसींचा उठाव करण्याची काही आवश्यकता नव्हती. त्यामुळे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही व्यक्त्तिगत टीका न करता संयम ठेवावा. टीका केल्याने समाजात मतमतांतरे, मतभेद होतात आणि शांतता भंग होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe