Ahmednagar Breaking : दोन भीषण अपघात, माजी सैनिकासह युवकाचा मृत्यू

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील अपघाताची मालिका सुरूच आहे. मागील काही घटना ताजा असतानाच आता आणखी दोन अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

पहिली घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. अहमदनगर – दौंड मार्गावर काष्टी शिवारात परिक्रमा इंजिनिअरिंग कॉलेज समोर दुचाकी-आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. यात मोटरसायकल चालक जागीच ठार झाला.

अक्षय हरिभाऊ सप्रे (वय २९, रा.सप्रेवाडी) असे मृताचे नाव आहे. २६ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता हा अपघात झाला. २६ नोव्हेंबरला रात्री आठ वाजता परिक्रमा कॉलेजच्या गेटजवळ आयशर टेम्पो चालक संजय विठ्ठल साठे याने

रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वाहन चालवून मोटारसायकला जोरात धडक दिली. यानंतर तो तेथून निघून गेला. परंतु यात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

अपघाताची दुसरी घटना पारनेरमध्ये झाली. अहमदनगर – पुणे महामार्गावर सुपा येथे रविवारी सायंकाळी अपघात झाला. यात माजी सैनिक शिवाजी ठाणगे यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना कंटेनरने त्यांना धडक दिली.

रविवारी सायंकाळी शिवाजी दत्तू ठाणगे (वय अंदाजे ४२) हे त्यांच्या स्कूटीवरून सुपा नगर रोडवर हॉटेल संदीप जवळ रस्ता ओलांडत आसताना पुण्याहून नगरच्या दिशेने जात आसलेल्या कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली. यात माजी सैनिक स्कूटीसह कन्टेनरच्या चाकाखाली सापडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती कळताच पीएसआय पवार, सुपा पोलीस स्टेशनचे चालक शिंदे, ट्रॅफिकचे पोलीस हवालदार शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सातपुते यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. कंटेनर चालकाविरुद्ध सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe