अहमदनगर जिल्ह्यात उसाची पळवापळवी सुरू ! मजुरांअभावी शेतकरी चिंतेत

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : यंदा पावसाने ओढ दिल्याने शेवगाव तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे धरण परिसर क्षेत्रात उसाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यंदा क्षेत्र घाटल्याने उसाची पळवापळवी सुरू झाली आहे.

ऊस दराबाबत संभ्रमावस्थेत असलेला शेतकरी, ऊसतोड कामगारांच्या कमतरतेने चिंतेत आहे. शहरटाकळी, ढोरसडे, अंत्रे येथील शेतकऱ्यांचे उसाचे पीक मजूर व साखर साखर कारखान्याच्या नियोजनाअभावी वाळुन चालले आहे. त्यामुळे गटातील शेतकरी कार्यक्षेत्राबाहेरील साखर कारखान्यांना ऊस देण्याच्या मनस्थितीत आहेत.

मागील आठवड्यात ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्र घुले पाटील यांनी पत्रकाद्वारे शेतकऱ्यांना आवाहन केले होते की, उसाचे क्षेत्र जादा झाल्यानंतर आम्ही तुमच्या ऊस घेऊन जातो.

मात्र, यंदा उसाचे प्रमाण कमी असल्याने इतर कारखान्यांना ऊस न देता कारखान्यास सहकार्य करून आपला ऊस ज्ञानेश्वर साखर कारखान्याला देण्याचे आवाहन घुले यांनी केले होते. ज्ञानेश्वरच्या नियोजनावर मात्र शेतकरी नाराज असल्याचे दिसून येते.

गटातीलच घुले बंधूचे विश्वासू असलेल्या एका राजकीय नेत्याच्या उसाला बाहेरील कारखान्याची ऊसतोड सुरू असल्याने हा विषय परिसरात चर्चेचा ठरला आहे. परिसरात गंगामाई, केदारेश्वर, वृद्धेश्वर, प्रवरा व संगमनेर, या कारखान्यांच्या तोडी सुरू झाल्या आहेत.

यावर्षी पावसाळा कमी झाल्याने उन्हाळ्याची तीव्रता जाणवणार आहे. उसाला लवकर ऊसतोड मिळाल्यास कांदा, गहू, हरभरा, आदी पिके घेता येतील. दोन जुगाड त्याच्या मागे चार कोयते दिलेत, असे असेल तर वेळेवर ऊसतोड कशी मिळेल.

कारखाना प्रशासन यात लक्ष घालून शेतकऱ्यांना ऊसतोड मजूर उपलब्ध करून वेळेवर ऊसतोड होईल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.प्रवरा व संगमनेर सहकारी साखर कारखान्यांनी तीन हजार रुपये भाव जाहीर केल्याने शेतकरी या कारखान्यांशी संपर्क साधत आहेत.

ज्ञानेश्वर कारखानाच्या नियोजनावर मात्र परिसरातील शेतकरी नाराज असल्याची चर्चा आहे. कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणण्यास ज्ञानेश्वरचे प्राधान्य असल्याचे बोलले जाते. मात्र, शहरटाकळी गटात ऊसतोड मजुरांच्या तीनच टोळ्या कार्यरत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe