Maharashtra News : महाराष्ट्र सरकारने समन्यायी कायद्याचा चुकीचा अर्थ काढून भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेले पाणी तातडीने बंद करावे, या मागणीसाठी संगमनेर तालुका काँग्रेसच्या वतीने संगमनेर बसस्थानक परिसरात काल सोमवारी आंदोलन करण्यात आले.
उत्तर नगर जिल्ह्यामध्ये यंदा पाऊस कमी पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, असे असताना भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले आहे.
सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसने आंदोलन केले. याबाबत काँग्रेसच्या वतीने नायब तहसीलदार लोमटे यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी बाबासाहेब ओहोळ, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, लक्ष्मणराव कुटे, सुरेश थोरात, निर्मला गुंजाळ, संतोष हासे, विलास कवडे, नवनाथ अरगडे, चंद्रकांत कडलग, पद्माताई थोरात, मिनानाथ वर्षे, जावेद शेख, नाना वाघ, राजेंद्र कडलग यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाबा ओहोळ म्हणाले, भंडारदरा व निळवंडे धरणातील पाणी हे या भागातील दुष्काळी शेतकऱ्यांसाठी आहे. समन्यायी पाणी वाटपांमधून अगोदर या भागातील दुष्काळी जनतेला पाणी दिले पाहिजे, असा अर्थ आहे.
यावर्षी मराठवाड्यात आपल्यापेक्षा जास्त पाऊस झाला असून केवळ चुकीचा अर्थ वापरून पाणी सोडण्याचे काम होत आहे. याबाबत उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून दर तीन वर्षांनी या आदेशाचे पुनर्लोकन करून सूत्रात बदल करणे, अशी कार्यवाही करावी, अशी आदेश आहेत.
मात्र यामध्ये शासनाने काहीही केलेले नाही. समन्यायी पाणी वाटप कायद्याचे जे सूत्र आहे. ते चुकीच्या पद्धतीने राबवले जात असल्याने आमदार बाळासाहेब थोरात यांनी या कायद्याला सातत्याने विरोध केला असून त्यांच्या नेतृत्वाखाली या कायद्याविरोधात संगमनेर मध्येच पहिले आंदोलन झाले असून
कायदेशीर लढाई लढली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मिलिंद कानवडे, नवनाथ आरगडे, रमेश गुंजाळ, सुभाष सांगळे, विलास कवडे, निर्मला गुंजाळ, प्रा. बाबा खरात यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी शेतकऱ्यांनी सत्काराच्या विरोधात घोषणा देत तातडीने पाणी बंद करण्याची मागणी केली.