Agriculture News : ऊस व कपाशीचे उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतेत !

Ahmednagarlive24 office
Published:
Agriculture News

Agriculture News : यावर्षी अल्पपर्जन्यवृष्टी झाल्याने अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी उधार, ऊसणवार करून कपाशी व उसाची लागवड केली. मात्र, उत्पादनात मोठ्या घट झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

शेवगाव तालुक्यात व विशेष करून पूर्व भागात बोधेगाव, बालमटाकळी, हातगाव, मुंगी, चापडगावसह लाडजळगाव परिसरात नगदी पीक व शेतकऱ्यांच पांढरं सोनं समजल्या जाणाऱ्या कपाशी पिकाचा प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात पेरा होत असल्याने व तालुक्यातील कपाशी पिकाची प्रतवारीही चांगली असल्यामुळे तालुक्यातील कापसाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

परराज्यातील अनेक व्यापारी तालुक्यात कापसू खरेदीसाठी येत असतात; परंतु चालूवर्षी मेघराजाने डोळे वटारल्याल्याने यावर्षी उत्पादनात मोठी घट झाली असल्याने तसेच कपाशीला चांगला भावही मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले असल्याचे दिसून येत आहे तसेच पाण्याअभावी कपाशीचे क्षेत्र कमी झाले आहे.

सध्या अनेक साखर कारखान्यांचा गळित हंगाम सुरू झाला असून, गळिताला येणाऱ्या उसाचे वजन घटल्याचे दिसून येत आहे. त्याचा मोठा परिणाम शेतकरी वर्गासह कारखान्यांवरही होणार असल्याचे दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe