EPS-95 Rule: तुम्हाला माहित आहे का EPS-95 पेन्शन योजना? लाखो पेन्शनधारकांना मिळतात हे फायदे! वाचा ए टू झेड माहिती

EPS-95 Rule:- केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक विभागांमध्ये लाखो कर्मचारी काम करत असतात व कालांतराने ते निवृत्त होतात. या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जी काही पेन्शन मिळते त्या पेन्शनचे संपूर्ण नियमन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून केले जाते.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओ ही संघटना कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. यामधीलच एक महत्त्वाची सुविधा किंवा योजना म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजना 1995 अर्थात ईपीएस 95 ही होय.

या योजनेचे देशात 75 लाख पेन्शनधारक कर्मचारी हे लाभार्थी आहेत व यामध्ये जवळपास सहा कोटी पेक्षा जास्त भागधारक देखील आहेत. याच ईपीएस 95 संबंधी महत्वाच्या बाबी आणि यासाठी कोणते कर्मचारी पात्र असतात? याबद्दलचे महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत.

 कर्मचारी पेन्शन योजना 1995 अर्थात ईपीएस 95 साठी कोण पात्र आहेत?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला देखील या योजनेचा फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओचे सदस्य असणे गरजेचे असून जो कर्मचारी  ईपीएफओचा सदस्य असतो त्याच्या पगारांमधून प्रत्येक महिन्याला प्रॉव्हिडंट फंडाच्या रूपाने त्याच्या ईपीएफ खात्यामध्ये एक निश्चित रक्कम जमा केली जाते व त्यामधील 8.33% रक्कम ही पेन्शन हेड मध्ये जात असते.

या अनुषंगाने जर ईपीएस 95 पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कर्मचाऱ्याला कमीत कमी दहा वर्षे सेवा पूर्ण करणे गरजेचे असते. कर्मचारी पेन्शन योजना अर्थात ईपीएस अंतर्गत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ईपीएफ सदस्य त्याच्या वयाच्या पन्नास वर्षापासून कमीत कमी दराने त्याची एपीएस अर्थात प्रॉव्हिडंट फंड काढू शकतो.

 कर्मचारी पेन्शन योजना 1995 अर्थात एपीएस-95 चे खास वैशिष्ट्ये

1- कर्मचाऱ्यांच्या वयाच्या 98 व्या वर्षी सेवानिवृत्तीनंतर सदस्याला पेन्शन मिळते.

2- बेरोजगारीच्या बाबतीत जर विचार केला तर वयाच्या 50 वर्षांपूर्वी देखील मुदतपूर्व सदस्य पेन्शनचा लाभ मिळतो.

3- सेवा सुरू असताना सदस्याला जर कायमस्वरूपी आणि संपूर्ण अपंगत्व आले तर अपंगत्व निवृत्तीवेतनाचा लाभ मिळतो.

4- सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर विधवा/ विधुर पेन्शन( पॅरा बारा(8) च्या पहिल्या तरतुदीसह) किंवा पेन्शन धारक

5- सभासद किंवा पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या पंचवीस वर्षापर्यंतच्या दोन मुलांसाठी एकावेळी बाल निवृत्तीवेतनाचा लाभ

6- सदस्य किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर किंवा जोडीदाराच्या मृत्यूनंतर 25 वर्षापर्यंतच्या दोन अनाथांना एकावेळी अनाथ पेन्शन.

7- अपंग बालक/ अनाथ मुलाच्या संपूर्ण आयुष्याकरिता अपंग बालक किंवा अनाथ निवृत्तीवेतनाचा लाभ

तसेच महत्त्वाचे म्हणजे जर सदस्याच्या मृत्यू झाला तर त्यानंतर कर्मचारी पेन्शन योजना 1995 च्या माध्यमातून अंतर्गत परिभाषित केल्यानुसार संबंधित सदस्याचे कुटुंब नसल्यास नामनिर्देशित पेन्शन सदस्याद्वारे संपूर्ण जीवनभर नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीला दिले जाते. जर सदस्याचे कुटुंब किंवा नॉमिनी नसेल तर सदस्याचा मृत्यू झाला तर आश्रित वडील किंवा आईला पेन्शन मिळते.