Garuda Purana : हिंदू धर्मात असे अनेक ग्रंथ आणि पुराणे आहेत ज्यांचा संबंध मनुष्याच्या व्यावहारिक जीवनाशी आहे. हा मनुष्याच्या 16 संस्कारांचा एक भाग मानला जातो. गरुड पुराण सुद्धा यातलेच एक आहे. गरुड पुराणात मानवी जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींची माहिती आहे. माणसाच्या वागण्या-बोलण्यासोबतच माणसाने आयुष्यात काय करावे आणि काय करू नये हे देखील या पुराणात स्पष्ट सांगितले आहे.
दरम्यान आज आम्ही तुम्हाला गरुड पुराणात दिलेल्या अशा गोष्टींबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्या बहुतेक लोकांना माहित नसतात आणि त्यांच्याकडून न कळत चुका होतात. ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात समस्या येतात.
गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे आज आम्ही तुम्हाला कोणत्या व्यक्तींच्या घरात अन्न खाऊ नये याबद्दल सांगणार आहोत आणि जर त्याने असे केले तर त्याच्या जीवनात अनेक अडचणी येतात आणि कोणत्या न कोणत्या संकटांना त्याला सामोरे जावे लागते. आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत.
‘या’ लोकांच्या घरी चुकूनही खाऊ नका !
संतप्त व्यक्तीचे घर
कधीही संतप्त व्यक्तींच्या घरी जेवण करू नका. याविषयी गरुड पुराणात सांगितले आहे की, जर एखाद्या व्यक्तीने संतप्त व्यक्तीच्या घरी भोजन केले तर त्या व्यक्तीचे गुण त्याच्या आत येतात.
गुन्हेगारांच्या घर
गुन्हेगारांच्या घरी कधीही अन्न खाऊ नये. असे म्हणतात की, जर तुम्ही गुन्हेगाराच्या घरी भजन केले तर तुम्हीही त्यांच्याप्रमाणेच पापात सहभागी होता. एवढेच नाही तर तुमच्या आत वाईट विचारांचा प्रभाव वाढू लागतो.
किन्नरांचे घर
गरुड पुराणानुसार सामान्य माणसाने कधीही किन्नरांचे घरी अन्न खाऊ नये. वास्तविक, किन्नर हे चांगले आणि वाईट दोन्ही असतात. या कारणास्तव यांच्या घरातील अन्न कधीही खाऊ नये, अन्यथा शरीरात नकारात्मकता वाढू लागते.
क्रूराचे घर
गरुड पुराणानुसार इतरांना दुखावणाऱ्या किंवा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या घरात अन्न खाऊ नये. अशा व्यक्तींना क्रूर मानले जाते. त्यांच्या घरी खाल्ल्याने तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतात.
आजारी व्यक्तीचे घर
आजारी वक्तींच्या घरी कधीही अन्न खाऊ नये, असे म्हणतात. जर एखादी व्यक्ती खूप दिवसांपासून आजारी असेल आणि तुम्ही त्याच्या घरी गेला असाल तर त्याच्या घरचे जेवण करू नका. जर तुम्ही त्यांच्या घरचे खाल्ले तर तुम्ही आजारी देखील पडू शकता.