Ratan Tata Brother Noyal Tata : रतन टाटा हे भारतातील एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ख्यातनाम आहेत. टाटा ग्रुपने संपूर्ण जगात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. उद्योगातील विविध क्षेत्रात टाटा समूहाने उत्तम कामगिरी केली आहे. Tata समूहाचे साम्राज्य आजच्या घडीला फारच विशालकाय बनले आहे. हे साम्राज्य रतन टाटा यांच्या दूरदृष्टीतून दिवसेंदिवस विस्तारत आहे.
विशेष म्हणजे रतन टाटा यांच्याप्रमाणेच उद्योग क्षेत्रात त्यांच्या धाकट्या बंधूंनी देखील चांगली नेत्र दीपक आणि वाखाण्याजोगी कामगिरी केली आहे. टाटा यांचे धाकटे बंधू श्रीमान नोएल टाटा हे टाटा समूहाच्या ट्रेंट लिमिटेड या कंपनीचे अध्यक्ष आहेत. दरम्यान त्यांनी या कंपनीत फारच उल्लेखनीय काम केले असून या कंपनीचे मार्केट कॅपिटल एक लाख कोटी रुपयांचे बनवले आहे. यामुळे कंपनीने एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
खरे तर बीएसइच्या एका ताज्या आकडेवारीनुसार सध्या फक्त असे 62 शेअर्स आहेत ज्यांचे मार्केट कॅपिटल एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच टाटा समूहाची ही रिटेल ट्रेंट लिमिटेड कंपनी रतन टाटा यांच्या बंधूच्या कठोर मेहनतीने या टॉपच्या 62 कंपन्यांमध्ये समाविष्ट होणार आहे. या निमित्ताने सध्या संपूर्ण देशभरात रतन टाटा यांच्या धाकट्या भावाची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. यामुळे सर्वत्र बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ सुबहानल्लाह ! असं बोललं जात आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, ट्रेंट लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये यावर्षी तब्बल 110 टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या चालू वर्षातच कंपनीच्या मार्केट कॅपिटलमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. या वर्षात कंपनीचे एकूण मार्केट कॅपमध्ये 52% हुन अधिक वाढ नमूद करण्यात आली आहे. यावर्षी कंपनीच्या मार्केट कॅपिटल मध्ये जवळपास 52 हजार कोटी रुपयांची भर पडली आहे.
आज अर्थातच एक डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 2830 रुपयांवर ट्रेड करत होते. हा या स्टॉकचा हाय लेव्हल आहे. विशेष म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर कंपनीचे शेअर्स १३५८ रुपयांवर ट्रेड करत होते मात्र आता ते 2830 रुपयांवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच शेअर्समध्ये जवळपास 110 टक्क्यांची वाढ झाली आहे.
कंपनीच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे आता कंपनीचे मार्केट कॅपिटल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या नऊ वर्षांच्या काळात चांगला परतावा दिला आहे. कंपनीने 9 वर्षा पैकी जवळपास आठ वर्ष गुंतवणूकदारांना चांगला सकारात्मक परतावा दिला आहे. एकंदरीत Ratan Tata यांच्याप्रमाणेचं त्यांच्या धाकट्या बंधूनी देखील व्यवसायात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे.