काय सांगता ! ‘या’ बँकांमध्ये एफडीवर मिळतेय 9% व्याज, जाणून घ्या डिटेल्स

Ahmednagarlive24 office
Published:

पैसे गुंतवणुकीचा सोपा व लोकप्रिय मार्ग म्हणजे एफडी. बँकेत फिक्स डिपॉझिट करणे हा एक सोपा व सुरक्षित मार्ग आहे. सध्या बँकेत ७ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. एफडी सध्या लोकप्रिय असण्याचे कारण असे की, यामध्ये गुंतवलेला पैसे सुरक्षित असतो व ग्यारंटेड रिटर्न मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का की काही बँका एफडीवर आता ९ टक्के पर्यंत व्याज देत आहेत. येथे आपण या सर्व बँकांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे तुम्हाला FD मध्ये गुंतवणूक करून 9% पेक्षा जास्त व्याज मिळेल. चला जाणून घेऊयात 

पहिल्या क्रमांकावर आहे युनिटी स्मॉल फायनान्स बँक

युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही एफडीवर सध्या सर्वाधिक व्याज देत आहे. ही बँक सध्या मुदत ठेवीवर 4.50 ते 9.50% पर्यंत व्याज देते. या बँकेत 61 ते 90 दिवसांसाठी FD केल्यास 5.50% व्याज मिळते. 91 ते 164 दिवसांसाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 5.75% व्याज मिळते. जर या बँकेत तुम्ही 1 वर्षासाठी एफडी केली तर तुम्हाला 7.35% व्याज मिळेल. 1001 दिवसांसाठी एफडी केल्यास 9% व याच कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी 9.50% व्याज मिळते.

दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक व्याज देणारी बॅंक म्हणजे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेत एफडी गुंतवणुकीवर देखील सर्वाधिक व्याज सध्या मिळत आहे. व्याजाचा विचार केला तर 4.50 ते 9.10% व्याज या एफडीवर मिळत असते. या बँकेच्या नियमित खातेदारांना 46 ते 90 दिवसांच्या FD गुंतवणुकीवर 4.50% व्याज तर 91 दिवस ते 6 महिन्यांच्या FD गुंतवणुकीवर 5% व्याज ही बँक देत आहे. 1 वर्षापर्यंतच्या एफडी केल्या तर 6.85% व्याज तुम्हाला मिळेल. 2 ते 3 वर्षांसाठी FD केल्यास 8.60% व्याज व ज्येष्ठ नागरिकांसाठी 9.10 टक्के व्याज या बँकेत मिळते.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेच्या एफडीबद्दल जाणून घेऊयात

या बँकेत देखील एफडीवर जास्त व्याज मिळत आहे. या बँकेत 3.00 ते 9.11 टक्के पर्यंत व्याज मिळत आहे. ही बँक तिच्या नियमित खातेदारांना 91 ते 180 दिवसांच्या FD गुंतवणुकीवर 5.75% व्याज. जर तुम्ही 12 ते 15 महिन्यांची FD केली तर 7.50% व्याज मिळेल. 750 दिवसांच्या FD गुंतवणुकीवर 8.51% व्याज दिले जात आहे.

इतर काही बँका

क्विटास स्मॉल फायनान्स बँक मुदत ठेवींवर 4 ते 9 टक्के व्याज, जन स्मॉल फायनान्स बँक मध्ये 3.50 ते 9.00 टक्के व्याज दिले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe