जबरदस्त ! ‘या’ शेअरने 4 महिन्यात दिले 269 टक्के रिटर्न, आता कंपनी देणार बोनस शेअर, वाचा कोणता आहे तो स्टॉक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Market Multibagger Stock : शेअर मार्केट हे अनिश्चितेने परिपूर्ण आहे. स्टॉक मार्केट मधील गुंतवणूक ही जोखीम पूर्ण असते. मात्र, येथील गुंतवणूक रिस्की असली तरी देखील शेअर मार्केट मधून गुंतवणूकदार खोऱ्याने पैसे जमा करतात. काही प्रसंगी निश्चितच लॉस देखील सहन करावा लागतो. पण ज्या लोकांचा मार्केटमधला अभ्यास चांगला आहे अशा लोकांनी शेअर मार्केटने भरभरून असे दान दिले आहे.

खरे तर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तज्ञ लोक लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. लॉन्ग टर्म मध्ये शेअर मार्केट मधून चांगला परतावा मिळतो असे तज्ञ लोकांचे म्हणणे आहे. ही गोष्ट निश्चितच खरी ठरते. मात्र, काही स्टॉक असे असतात जे अल्पकाळामध्ये चांगला परतावा देतात. काही स्टॉक लिस्टिंग झाल्याबरोबरच चांगला परतावा देण्याला सुरुवात करतात. आज आपण अशाच एका नवीन स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत.

ज्याने लिस्टिंग झाल्याबरोबर अवघ्या चार महिन्यांच्या काळात 259% रिटर्न देण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे आता या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना कंपनीकडून बोनस शेअर देखील मिळणार आहेत. आता निश्चितच तुम्हाला या स्टॉक बाबत जाणून घेण्याची आतुरता लागलेली असेल चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

कोणता आहे तो स्टॉक

हा स्टॉक आहे स्मॉलकॅप कंपनी अल्फालॉजिक इंडस्ट्रीजचा. या कंपनीच्या स्टॉकने सूचीबद्ध झाल्यापासून अवघ्या काही महिन्याच्या काळात जोरदार परतावा देण्याचा भीम पराक्रम केला आहे. टेस्टिंग झाल्यापासून हा स्टॉक रॉकेटच्या वेगाने भरारी घेत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या कंपनीचे शेअर्स जुलै 2023 मध्ये लिस्ट झालेत. कंपनीचे शेअर्स 96 रुपयांवर सूचीबद्ध झाले होते. पण गेल्या 4 महिन्यांच्या काळात या कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त कामगिरी केली आहे.

हे शेअर्स काल अर्थातच 30 नोव्हेंबरला 355.30 रुपयांवर पोहोचले होते. म्हणजे लिस्टिंग झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यात कंपनीच्या शेअर्सने 269 टक्के परतावा दिला आहे. आता बम्पर परतावा दिल्यानंतर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली आहे. अल्फालॉजिक इंडस्ट्रीजने नुकतेच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.

कंपनी देणार गुंतवणूकदारांना बोनस शेअर

Alphalogic Industries ने नुकत्याचं काही दिवसांपूर्वी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची घोषणा केली होती. 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची घोषणा कंपनीने केली. म्हणजेच ही कंपनी प्रत्येक शेअरमागे 1 बोनस शेअर देत आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कंपनीने 18 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या आपल्या कंपनीच्या बोर्ड मिटींगमध्ये हा निर्णय घेतला होता. कंपनीने आधी 24 नोव्हेंबरला बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती. पण नंतर ही तारीख चेंज केली. यानुसार आज अर्थातच 1 डिसेंबर 2023 ला बोनस शेअर्सच्या रेकॉर्ड डेटवर ट्रेडिंग करत आहेत.