Maharashtra Havaman Andaj : गारपिटीचे संकट संपले आता दिवस धुक्याचे ! काळजी घ्या ‘असे’ असणार वातावरण

Published on -

Maharashtra Havaman Andaj : मागील रविवारपासून अवकाळी पाऊस, गारपीट सुरूआहे. या अवकाळीने शेतीपिकांचे मोठेनुकसान केले आहे. मागील रविवार तर आजचा शनिवार सलग सात दिवस कुठेना कुठे अवकाळीचा फटका बसला आहे.

परंतु आता गारपिटीचे संकट टळले आहे. परंतु एक संकट टळले व शेतकर्यांसमोर दुसरे धुक्याचे संकट उभे राहिले. दोन दिवसापासून दाट धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे आता पिकांवर रोगाचे सावट आहे.

‘असे’ असेल वातावरण

अरबी समुद्रावरून आलेले वारे आणि ढगाळ हवामानामुळे वाढलेली आर्द्रता याचा परिणाम म्हणून गुरवार पासून राज्याच्या काही भागात दाट धुके पसरले आहे. रविवारपर्यंत हे असेच वातवरण राहील असे सांगितले जात आहे.

त्यानंतर धुके कमी होण्याची शक्यता आहे. पावसाळी वातावरण आता राज्यातून हळूहळू निवळत असून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या भागात किमान आणि कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सियसने घट होत आहे. त्यामुळे थंडी आता वाढेल.

मिचोंग चक्रीवादळ

४ डिसेंबर रोजी तामिळनाडू व आंध्र किनारपट्टी सीमावर्ती भागात मिचोंग चक्रीवादळ येणार आहे. मात्र महाराष्ट्रावर त्याचा कोणताही परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे याबाबत तरी दिलासा मिळाला आहे.

रविवारपासून वातावरण निवळणार

राज्यातील वातावरण रविवारपर्यंत असे राहील. त्यानंतर वातावरण निवळलं. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिकसह सोलापुरात दोन दिवस ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रविवारपासून पूर्णतः उघडीप राहील. विदर्भात मात्र पुढील ५ दिवस ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

शेतकरी संकटात

मागील काही दिवसात गारपीट, अवकाळी पावसाने शेतकरी कोलमडला आहे. पावसाने धुमाकूळ घालत अनेक हेकटर पिकांचे नुकसान केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe