Ahmadnagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी परिसरात अनेक दिवसांपासून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला असून,
Ahmadnagar Breakingएक मादी व तिची दोन पिल्ले या परिसरता फिरत असल्याचा संशय परिसरातील गावाकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मागील काही दिवसांपासून तालुक्यातील वडळी परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याच्या अनेक तक्रारी वन विभागाकडे येत, बिबट्याला जेरबंद करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली. मात्र बिबट्याला पकडण्याच्या उपाययोजना होत नसल्याने गावच्या सरपंचानी उपोषणाचा इशारा दिला होता.
वनविभागाने दोन दिवसांपूर्वी वडाळी गावातील शेलार वस्ती परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. गुरुवार (दि.३०) रोजी सकाळी पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला.
बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. मात्र बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्याने लोकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केल्याने वनविभागाचा कर्मचाऱ्यांना काम करताना अडचण निर्माण होत असल्याचे चित्र दिसून आले.
बिबट्या सकाळी पिंजऱ्यात अडकला मात्र लावलेला पिंजरा नादुरुस्त असल्याचे चित्र दिसून आले. या बाबत वनवीभागाशी संपर्क साधला असता त्यांनी बिबट्या पकडण्यासाठी लावलेल्या
पिंजऱ्याची लोखंडी पट्टी फुगल्यामुळे बिबट्याला शिफ्ट करण्यात अडचण येत असल्यने दुसरा पिंजरा मागवला असून, बिबटयाला वरिष्ठाच्या आदेशानुसार या ठिकाणाहून हलवून दुसरीकडे सोडण्यात येईल, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.