Maharashtra News : पाच दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेला खंडकरी शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निकाली काढला. वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी व सार्वजनिक उद्देशासाठी जमीन संपादित करण्याच्या त्यांच्या प्रस्तावास मंत्रीमंडळाने मान्यता दिली. हा ऐतिहासिक निर्णय स्वागतार्ह असल्याचे वाकडीचे माजी सरपंच डॉ. संपतराव शेळके व गोरक्षनाथ कोते यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना शेळके व कोते यांनी म्हटले, की पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमी आवाज उठवला. वेळोवेळी सरकारला धारेवर धरत खंडकरी शेतकऱ्यांच्या रास्त मागणीसाठी त्यांनी आंदोलनदेखील उभारले.
आज मंत्री विखे पाटील यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करीत खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. ही एक प्रकारे पद्मभूषण विखे पाटील यांना श्रद्धांजली म्हणावी लागेल. राज्य शासनाने वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्याचा निर्णय घेतल्याने हजारो हेक्टर
क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांना कसता येणार आहे. शेती व्यवसाय व शेती व्यवसायाशी निगडित व्यवसाय फलास येईल. रोजगार निर्मिती होऊन बेरोजगारी हटविण्यास मदत होईल.
यावेळी गणेश कारखान्याचे माजी संचालक अॅड. भाऊसाहेब शेळके, खासदार डॉ. सुजयदादा युवा मंचचे अध्यक्ष संदीपानंद लहारे, निळवंडे कृती समितीचे जालिंदर लांडे, माजी ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब कोते, अनिल कोते,
ग्रामपंचायत सदस्य सुनील कुरकुटे, प्रमोद जाधव, अतुल साबदे, ज्ञानदेव शेळके, पोपटराव लहारे, सोपानराव गोरे, अशोक कोते, हरिभाऊ गोरे, संदीप गोरे, सतीश कोते, निलेश कोते, वाल्मिक लहारे, राजेंद्र लांडे, गोकुळ लांडे, सोमनाथ शेळके, प्रवीण धनवटे, तसेच युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.