Numerology Numbers : हिंदू धर्मात जसे कुंडलीच्या आधारे भविष्य सांगितले जाते तसेच, अंकशास्त्राद्वारे देखील व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र ही एक महत्वाची शाखा आहे, ज्याद्वारे व्यक्तीचे भविष्य, वर्तमान, वागणूक इत्यादी. सांगितले जाते.
अंकशास्त्र हे एक शास्त्र आहे जे संपूर्णपणे संख्यांवर कार्य करते. यामध्ये जन्मतारखेच्या संख्येची बेरीज करून एक संख्या काढली जाते, त्या संख्येला मूलांक असे म्हणतात. याच मूलांकाच्या आधारे व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात, मूलांक संख्या 1 ते 9 पर्यंत आहेत जे कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित आहेत. म्हणूनच ग्रहांच्या हालचालींचा मानवी जीवनावर खोलवर प्रभाव पडतो.
आज आम्ही तुम्हाला अशा लोकांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यावर शनिदेवाची विशेष कृपा आहे. शनिदेवाच्या कृपेने हे लोक आपल्या जीवनात भरपूर संपत्ती कमावतात आणि यशही मिळवतात. आज जाणून घेऊया या लोकांची वागणूक, व्यक्तिमत्व आणि भविष्य याबद्दल.
ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला होतो, त्यांचा मूळ क्रमांक 8 असतो. हे लोक खूप मेहनती लोक असतात आणि त्यांच्यावर कायम शनिदेवाचा विशेष आशीर्वाद असतो.
हे लोक त्यांच्या नशिबापेक्षा त्यांच्या कर्मावर जास्त विश्वास ठेवतात आणि कामातून ओळख निर्माण करणे ते योग्य मानतात. त्यांनी जे काम हाती घेतले ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे लोक कोणाच्या दबावाखाली काम करत नाहीत. त्यांना प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीशी कसे जुळवून घ्यावे हे माहित आहे.
मूलांक ८ क्रमांकाचे लोक मेहनती असतात. ते स्वभावाने गुपित ठेवणारे लोक असतात.हे व्यक्ती प्रत्येक गोष्टीचे विचारपूर्वक विश्लेषण करूनच पावले उचलतात. त्यांना दिखावा अजिबात आवडत नाही आणि तर्कशुद्ध वागणे आणि बोलणे त्यांना पसंत असते. त्यांना स्वातंत्र्य खूप आवडते.
हे लोक रिअल इस्टेट, तेल, पेट्रोल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम आणि लोह संबंधित व्यवसायांमध्ये चांगले पैसे कमावतात. या लोकांसाठी 8, 17 आणि 26 तारखेला खूप शुभ मानले जाते. ते शुक्रवार आणि शनिवारी कोणतेही काम करतात तेव्हा त्यांना यश मिळते.