पिंपरी चिंचवड जवळील थेरगाव घाट येथे पवना नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी (१५ मे) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा मृतदेश आढळून आला असून मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.
महिलेचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे आहे. वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना नदीपात्रात चिंचवड जवळील थेरगाव घाट येथे एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांकडून अग्निशामक दलास पाचारण करून महिलेचा मृतदेह नदीपात्राबाहेर काढण्यात आला.
मृत महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी वाकड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.