भविष्यात राहुरी तालुक्यात सिंचनाचा प्रश्न निर्माण होऊ नये. म्हणून सुमारे वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी मी दूरदृष्टीने आमदारकीच्या माध्यमातून राहुरी तालुक्यात सात कोल्हापूर टाईप बंधारे बांधण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे नदी काठाशेजारील चार ते पाच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले.
नदी काठाशेजारील क्षारयुक्त पाण्यात बदल होऊन गोड पाणी मिळू लागले. शेतकरी बारामाही शेती करू लागले. दुग्ध व्यवसायही वाढला. यामुळे आपण केलेल्या कामाचे समाधान वाटते, असे प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले.
राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील मानोरी येथील बंधाऱ्याच्या पाण्याचे पूजन तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. तनपुरे म्हणाले, की मानोरी, केंदळ येथील हा सर्वात पहिला व सर्वांत मोठा केटीवेअर आहे. या बंधाऱ्यामुळे केवळ नदी काठा शेजारीलच नव्हे तर परिसरातील पाच ते सहा गावच्या सुमारे ८०० हेक्टर शेतीला फायदा झाला आहे.
त्यामुळे दूध व्यवसाय वाढण्यास देखील फायदा झालेला आहे. बारामाही शेती शेतकरी पिकवत आहे. मी त्यावेळी मुळा नदीवर चार व प्रवरा नदीवर तीन कोल्हापूर बंधारे बांधण्यासाठी पाठपुरा करून निधी उपलब्ध करून काम केले.
त्यावेळी सात केटी वेअरसाठी केवळ चार कोटी रुपये खर्च आला होता. आता मात्र एका कोटीवरसाठी एवढा खर्च लागू शकतो अशी परिस्थिती आहे. या बंधाऱ्यामुळे खऱ्या अर्थाने राहुरी तालुक्यातील तसेच श्रीरामपूर तालुक्यातील काही गावांना, शेतीला त्याचा आज लाभ होत आहे.
माझे सातत्याने या केटी वेअर व मी केलेल्या पुलाच्या कामांवर लक्ष असते. खाली जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर मी पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता सायली पाटील यांना बंधारे भरून देण्यासाठी सांगितले होते.
तर आमदार प्राजक्त तनपुरे यांनीदेखील नियोजन समितीच्या बैठकीमध्ये त्यासाठी आग्रह धरून बंधारे भरून देण्यासाठी प्रयन केले होते. आता किमान मार्चपर्यंत नदीकाठा शेजारील शेतकऱ्यांना पाण्याची अडचण येणार नाही.
अन्य भागाला डाव्या व उजव्या कालव्याच्या माध्यमातून रोटेशन होईल, असेही ते म्हणाले. यावेळी मानोरी, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रुक, चंडकापूर, वळण, ब्राम्हणी येथील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी प्रामुख्याने केंदळचे उपसरपंच शिवाजी आढाव, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब खुळे, माजी उपसभापती रवींद्र आढाव, साखर कारखान्याचे संचालक भारत तारडे, माजी सरपंच सुभाष आढाव, संचालक राजेंद्र आढाव, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव, प्रमोद तारडे, डॉ. राजेंद्र पोटे,
अॅड. संजय पवार, पीरखा पठाण, बाबासाहेब भोईटे, नामदेव तारडे, कानिफनाथ तारडे, बाळासाहेब पेरणे, अण्णासाहेब देवरे, गंगाधर जरे, राहुल म्हसे, लक्ष्मण म्हसे, डॉ. बाबासाहेव आढाव, ज्ञानेश्वर खुळे, बाबासाहेब आढाव, प्रकाश आढाव, ताराचंद बनकर, कान्होजी तारडे, गोविंद जाधव, सोपान डोंगरे, भारत विटनोर, गुंजाळ, शिवाजी गुंजाळ उपस्थित होते.