मतदारसंघात विकास कामे करताना आपण योग्य नियोजन केले. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. खंडाळा गावासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अजूनही काही कामे बाकी असून ती पुढील काळात मार्गी लागतील, असे प्रतिपदन आमदार लहू कानडे यांनी केले.
तालुक्यातील खंडाळा येथील एका कार्यक्रमानंतत आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी आ. कानडे म्हणाले, विकास कामांसाठी निधी आणणे चांगले काम आहे. परंतु तो निधी वेळेत खर्च करून कामे उभी करणे हे अधिक अवघड आहे. त्यामुळे त्याचे योग्य नियोजन करून कामे केली आहेत.

खंडाळा गावात व्यायाम साहित्य, पेव्हिंग ब्लॉक हायमॅक्स, एलएफडी, रस्ते, तलाठी कार्यालय, अशी कामे मंजूर केली आहेत. पूर्वी रस्त्यावर खड्ड्यांमुळे अपघात होत. आता रास्ता चांगला झाल्याने सुसाट वेगामुळे अपघात होतात.
त्यामुळे येथे गतिरोधक बसवू. शिक्षणामुळे आपणास सर्व काही मिळाले, याची जाणीव असल्याने आपण सर्व जिल्हा परिषद शाळा डिजिटल केल्या. त्याचे चांगले परिणाम होत आहे. अनेक हायस्कूलमध्ये एलएफडी दिले. येथील रयतच्या शाळेने मागणी केल्यास मदत करू. शिक्षणाच्या बाबतीत आपण मागे राहणार नाही.
अनेक गावात गावठाण नसल्याने घरकुल होत नाहीत. अनेक गावांना शेती महामंडळाशिवाय दूसरी जागा नाही. येथेही तो प्रश्न आहे. जागा मिळण्यासाठी या गावाने सर्वप्रथम प्रस्ताव दिला. परंतु त्यात तांत्रिक अडचणी होत्या.
त्यासाठी आपण संबंधितांना भेटलो, पत्रव्यवहार केला. हा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल, असेही आ. कानडे यावेळी म्हणाले. याप्रसंगी बापू सदाफळ, अनिल ‘ढोकचोळे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आप्पासाहेब शिंगोटे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी माजी नगरसेवक अशोक कानडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण नाईक, नानासाहेब रेवाळे, वळदगावचे अशोक भोसले, भास्करराव ढोकचोळे, जयसिंग ढोकचोळे, सोसायटीचे चेअरमन राहुल शिंगोटे, खंडाळ्याच्या सरपंच छाया बर्डे, उपसरपंच भारती वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य संगीता ढोकचोळे,दिनकर सदाफळ, अनिल ढोकचौळे, बापू सदाफळ, बाबासाहेब ढोकचोळे, विजय ढोकचौळे उपस्थित होते.