बोल्हेगाव नागापुर भागातील नागरिकांचे प्रश्न सुटावेत , त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात विविध विकासकामांसाठी आपण नेहमीच विविध पातळ्यावर पाठपुरावा करून ती मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.
या माध्यमातून अनेक प्रश्नही मार्गी लागले आहेत. प्रलंबित कामांसाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे ६० लाखांचा निधी या भागातील कामांसाठी मंजुर केला.

या निधीच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांमुळे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. यापुढील काळातही नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपण कार्यरत राहू, असे अक्षय कातोरे यांनी सांगितले.
बोल्हेगाव नागापूर परिसरातील ना.राधाकृष्ण विखे व खा.डॉ.सुजय दादा विखे पा.यांच्या विशेष प्रयत्नातून व आकाश दादा कातोरे यांच्या पाठपुरव्यामुळे मंजूर झालेल्या सुमारे ६० लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभ माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते आंबेडकर चौक, नागापूर,बोल्हेगाव या ठिकाणी झाले.
याप्रसंगी लोभाशेट कातोरे, माजी नगरसेवक दत्ता सप्रे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अक्षय कातोरे, बबनराव कातोरे, अशोक ‘कोकाटे,बाळासाहेब पाखरे आदि उपस्थित होते.