हिंदू धर्म हा विश्वाला कुंटुब मानणारा आहे. गोमातेची सेवा हा आपला परमधर्म आहे. गोरक्षा ही राष्ट्ररक्षा मानली जाते. गोसेवकांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत. गोहत्याबंदी कायद्याची अंमलबाजवणी करावी. गोसेवकांना सरक्षण द्यावे.
गाईनी शेतात थोडे खाल्ले असेल तर त्यामुळे माणसामाणसांत व गावात वाद वाढवू नयेत. मात्र गोसेवकांवर हल्ले करू नयेत. हा प्रश्न सामंजस्याने मिटवावा, असे आवाहन देवगड संस्थानचे मंहत व रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य भास्करगिरी महाराज यांनी केले.
येथील तहसील कार्यालयावर गोसेवक, सकल हिंदू समाज व वारकरी मंडळाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु धर्माच्या पताका घेवुन गोसेवक ‘व वारकरी मंडळी भजन करीत तहसील कार्यालयावर येऊन धडकली.
या वेळी आमदार मोनिकाताई राजळे, देवगड संस्थानचे महंत प्रकाशनंद गिरीजी महाराज, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके, दिपक महाराज काळे, आदिनाथ महाराज आंधळे, राम महाराज उदागे, ज्ञानेश्वर महाराज बटुळे,
रामकिसन तापडीया, ज्ञानेश्वर महाराज सबलस, सुभाष महाराज दिवटे, भागवत महाराज मरकड, अशोक महाराज ‘कोळगे, हरी महाराज घाडगे, गणेश महाराज आरगडे, संतोष महाराज मुंगुसवाडेकर, संतोष महाराज चोपडे, नानाभाऊ महाराज पवार, अमोल गर्जे, गोकुळभाऊ दौंड, श्रीकांत जाजु, हरीओम रासणे, नानासाहेब पालवे, सुनिल पाखरे, सचिन नागापुरे, जिल्ह्यातील आलेले गोसेवक व महाराज मंडळी उपस्थित होते.
या वेळी भास्करगिरी महाराज म्हणाले, गोमाता ही आमची अस्मिता आहे. गोमाता व गोसेवकाला आधार देण्याचे काम जनतेचे आहे. प्रशासन व सरकार यांनी देखील आमच्याबद्दल चांगली भावना ठेवली पाहिजे.
कत्तलखाने बंद झाले पाहिजेत. गोसेवकांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत. गोसेवकांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवणे हे बरे नाही. शंभर एकर शेती असणारा शेतकरी एक गाय पाळू शकत नाहीत. तिनशे गाई सांभाळणाऱ्या गोसेवकाला मारहाण होते. गाईने थोडेफार नुकसान केले असेल. चूक पदरात घ्यावी.
डुकराने पिकाचे नुकसान केले व दुष्काळ आणि अतिवृष्टीने पिके गेली तर काय करतो आपण. आम्ही गाई पिकांची नुकसान करणार नाहीत, याची काळजी घेवु. माणसा- माणसांत भेद करु नका. गोमाता ही सर्वांची आहे. तिची सेवा करा. गोमातेचा तळतळाट चांगला नाही. गोमातेचा आशिर्वाद घ्या. तुमचे कल्याण होईल. गोसेवकाला मदत करा. गोशाळाच छावण्या समजुन अनुदान द्याव, गोसेवकाला मानधन मिळावे, अशी आमची मागणी आहे.
या वेळी आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या, गोसेवा हा आपला धर्म आहे. सर्वांनी सामजस्यांनी रहावे. वाद करु नयेत. आपण सर्वजण एकच अहोत. तालुक्यात गोशाळेचे प्रमाण चांगले आहे.
अनेकजण गोपालन करीत आहेत. जनतेने गोमातेसाठी योगदान द्यावे. गोरक्षकाला संरक्षण देण्याचे काम प्रशासनाचे आहे. शिरापुर येथील प्रकार चांगला नाही. हा विषय सामंजस्याने मिटवला जाईल. आम्ही तुमच्या सोबत आहोत. ही आपली सामुहीक जबाबदारी आहे. ती पार पाडली पाहिजे.