संगमनेर – तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावर नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या टेम्पोला कर्जुले पठार शिवारात झालेल्या अपघातात नाशिक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील दोन कर्मचारी जागीच मृत्यू झाले, तर चार जण गंभीर जखमी झाले.
याबाबत सविस्तर घटना क्रम असा कि, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील सहा कर्मचारी जुना आग्रा रोड त्रंबक नाका येथून शासकीय टेम्पो ( एमएच. 15 एबी. 59 ) मधून पुण्यातील येरवडा कारागृहातील मुद्रणालयात स्टेशनरी आणण्यासाठी सकाळी निघाले होते. चालक डी. टी. देवरे टेम्पो चालवित होते.
संगमनेर तालुका हद्दीतील पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गवर कर्जुले पठार शिवारात एका वाहनाने त्यांच्या टेम्पोला हुल दिली. त्यामुळे टेम्पो पलटी झाला. टेम्पोच्या मागे बसलेल्या तिघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. यात अनिल सोपान कोळी व जगन्नाथ पोपट सणधन (दोन्ही राहणार नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला.
- नितीन गडकरींची मोठी घोषणा ! टोल रांगेत थांबण्याची गरज संपणार…
- Cheapest electric car : १ लाखांत इलेक्ट्रिक कार ! सिंगल चार्जवर किती चालणार ?
- Artificial Intelligence मध्ये करिअर कराल तर लाखो कमवाल ! अशी आहे करिअरची मोठी संधी!
- शेतजमीन किंवा मालमत्तेवर अतिक्रमण झालाय का? ‘या’ मार्गांचा वापर करा आणि स्वतःचा हक्क मिळवा
- शक्तीपीठ महामार्ग नियोजित मार्गानुसारच होणार! दोन महिन्यात मोजणी करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश