शासनाची जायकवाडी पक्षी अभयारण्यात तरंगता सौर प्रकल्प उभारण्याची तयारी, पण पक्षांचा अधिवास नष्ट होऊन पर्यावरचा ऱ्हास होणार..

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला मोठं भौगोलिकक्षेत्र असल्याने निसर्गाची देन देखील लाभली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी अभयारण्य असल्याने अनेक पक्षी, प्राणी यांचा मोठा अधिवास जिल्ह्यात आहे.

अनेक स्थलांतरित पक्षी देखील पाहायला मिळतात. जायकवाडी धरणातील पक्षी अभयारण्य देखील अशीच निसर्गाची खाण. परंतु आता या अभयारण्यावरून शासन व पर्यावरण प्रेमींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

याचे कारण असे की, जायकवाडी धरणातील पक्षी अभयारण्याच्या तब्बल सहा हजार हेक्टरवर राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ (एनटीपीसी) तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे.

परंतु यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल, पक्षांच्या अधिवासावर परिणाम होईल असे पर्यावरणप्रेमी म्हणत आहेत.

* तरंगता सौरऊर्जा प्रकल्प

महामंडळाने २ महिन्यांपूर्वी या अभयारण्यातील परिसराची पाहणी केली असून हा परिसर इको सेन्सिटिव्ह झोन असल्याने येथे असा प्रकल्प उभारता येणार नाही असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

तर यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड पाठपुरावा करत असल्याचे समजते. सप्टेंबरमध्ये एनटीपीसीच्या पथकाने ही पाहणी केली होती. पाहणीनंतर या प्रकल्पाच्या विरोधाला सुरुवात झाली आहे. परंतु दुसरीकडे शासन यासाठी प्रयत्नशील आहे.

३० नोव्हेंबर २०२३ रोजी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत या प्रकल्पाबाबत बैठक बोलावली होती. एनटीपीसी-महाराष्ट्र शासनात सामंजस्य करार करणे, पर्यावरणविषयक सर्वेक्षणासाठी एजन्सी नेमणे तसेच स्थानिक पातळीवरील अडचणी सोडवणे आदींबाबत येथे चर्चा झाली.

विशेष म्हणजे याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्राकडे पाठपुरावा करू असेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले आहे. ही माहिती समजताच पर्यावरणप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला असून विरोध होऊ लागला आहे.

* पक्षांचा अधिवास नष्ट होण्याची शक्यता

सौरऊर्जा पॅनलमुळे काही वाईट परिणाम होतील. सौर पॅनलमुळे सूर्याची किरणे पाण्याखाली जाणार नसून पाण्यातील जीव आणि पक्ष्यांची अंडी घालण्याचे ठिकाण यामुळे संपुष्ठात येईल. अन्न नसल्याने स्थलांतरित पक्षी येणार तर नाहीतच शिवाय येथील पक्ष्यांच्या अधिवासाची जागा घटून धरणातील जैवविविधता संपुष्ट होईल असे मानद वन्यजीवरक्षक डॉ. किशोर पाठक म्हणाले आहेत. विशेष धक्कादायक म्हणजे या प्रकल्पामुळे कहार समाजातील २० हजार मच्छीमारांवर बेकारीची कुन्हाड कोसळेल तो भाग वेगळाच.

* जायकवाडीच्या २४ हजार हेक्टर पैकी किती क्षेत्र लागेल.

जायकवाडीचे सध्या २४ हजार हेक्टर क्षेत्र असून यात जर १ मेगावॅट सौरऊर्जेसाठी प्रकल्प उभारला तर ५ हेक्टर व १२०० मेगावॅटसाठी ६००० हेक्टर क्षेत्र याठिकाणी लागणार आहे. हे सर्व सक्सेस झाले तर भविष्यात २००० मेगावॅटचा विस्तार केला जाईल, त्यासाठी १० हजार हेक्टर क्षेत्र व्यापले जाईल.

* या अभयारण्यात आढळतात इतक्या प्रजाती

केंद्राने १२ जुलै २०१७ रोजी हे क्षेत्र इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर केलेले होते. हा झोन तब्बल १०० गावांत १४९.०५ चौरस किमी परिसरात असून येथे जैव विविधता आहे. येथे माशांच्या ५०, सापांच्या १२ प्रजाती आढळून येतात. कायम वास्तव्यास करणारे २०० प्रजातींचे पक्षी, ७० प्रजातीचे स्थलांतरित पक्षी, २७ प्रजातींची फुले आढळत असतात त्यामुळे येथे जैव विविधतेची खाण आहे.

* पर्यावरण प्रेमी आक्रमक

आता पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले असून हा परिसर पक्ष्यांसाठी संरक्षित असूनही सरकार त्यावर घाव घालत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करत आहेत. या सर्व प्रयत्नांना विरोध करून जैवविविधता धोक्यात आणण्याच्या प्रयत्नांविरोधात जनहित याचिका दाखल करू असे मानद वन्यजीवरक्षक डॉ. किशोर पाठक यांनी म्हटले आहे. -डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीवरक्षक

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe