Ahmednagar Politics : कोल्हे-थोरातांची जवळीकता विखेंच्या जिव्हारी ! विखेंची राष्ट्रवादीच्या आ. काळेंसोबत कोल्हेंच्या विरोधात मोर्चेबांधणी

Tejas B Shelar
Published:

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेच्या राजकारणात विविध रंग दिसू लागले आहेत. कोपरगावमध्ये काळे कोल्हे यांचा अनेक वर्षांपासून राजकीय संघर्ष आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचा आशुतोष काळे यांनी पराभव केला होता.

हा पराभव विखे यांच्यामुळेच झाला असा रोप कोल्हे यांनी केला होता. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. आता अलीकडील काळात विवेक कोल्हे यांनी आ. बाळासाहेब थोरात यांच्याशी जवळीक साधली.

परंतु ही जवळीक विखे यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते. त्यामुळे आता मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राष्ट्रवादीचे आ. काळे यांना सोबत घेत कोल्हेंविरोधात मोर्चे बांधणी सुरु केल्याचे दिसते.

विखे पाटील यांना शह

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील गणेश कारखाना निवडणुकीत भाजपच्या विवेक कोल्हे यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे एकत्र आले व त्यांनी विखे यांची सत्ता खाली खेचली.

त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकात विखेंचा पराभव करण्यासाठी विवेक कोल्हे यांनी काँग्रेसच्या थोरात यांना बरोबर घेत कंबर कसल्याचे दिसून आले. आता साई कर्मचारी सोसायटीत देखील कोल्हे थोरात एकत्र आले आहेत.

मंत्री विखे पाटील यांची मोर्चेबांधणी

आता राधाकृष्ण विखे पाटलांनी आपला मोर्चा कोपरगाव मतदारसंघात वळवला असून आमदार आशुतोष काळे याना सोबत घेत कोल्हेंच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

त्यांनी काळे यांच्या समवेत विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. आ. काळे यांना बरोबर घेत त्यांनी मंगळवारी कोपरगाव तालुक्याचा दौरा केला. आता आगामी काळात कोल्हे काय भूमिका घेतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांची कोल्हेंवर टीका तर काळेंना विजयाची गॅरंटी

कोपरगाव तालुक्यात पालकमंत्री विखे यांची सासुरवाडी आहे. त्यांनी कोपरगाव दौऱ्याची सुरुवात आपल्या सासरवाडीतूनच केली. त्यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन करत आ. काळे यांचे कौतुक केले.

यावेळी ते म्हणाले की, आशुतोष काळे यांनी चांगलं काम कराव, त्यांना जिथे शासनाची मदत लागेल तेथे मी त्यांच्यासोबत राहून त्यांना मदत करेल. तसेच पुढे बोलताना तर विजयाची खात्रीच दिली.

ते म्हणाले, जशी मोदी साहेबांची गॅरंटी तशी माझी तुम्हाला गॅरंटी आहे त्यामुळे आता तुम्ही चिंता करू नका. तसेच ते म्हणाले की, तुम्ही कोणाच्या जिरवायच्या भानगडीत पडू नका, कोणाची जिरवायची हे काम माझ्यावर सोडा असं म्हणत विखेंनी कोल्हेंवर अप्रत्यक्ष टीकाच केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe