Ahmednagar News : कोपरगाव मतदारसंघाचा मागील चार वर्षात झालेला विकास पाहता आ. आशुतोष काळे यांनी मतदारसंघाच्या विकासाची केलेली कामगिरी उल्लेखनीय असून त्यांच्या रूपाने कोपरगावला उमदं,
कर्तृत्वान, गतिमान नेतृत्व लाभले. याचा स्थानिक जनतेबरोबर मला देखील आनंद वाटत आहे, असे गौरवोद्गार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे आ. आशुतोष काळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ऑनलाईन प्रणालीद्वारे मंत्री विखे पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आ. काळे यांच्या पुढाकारातून माहेगाव देशमुख प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण झाली.
गोदावरीच्या आवर्तनाबाबत आ. काळेंचा आग्रह आहे. त्यासाठी मागील काही दिवसांपासून ते माझ्या संपर्कात आहेत. त्याबाबत तातडीने नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे.
आ. काळे यांनी असेच न्यायविकासात्मक कामांसाठी पुढाकार ठेवल्यास कोपरगावचा कायापालट होण्यास ण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी राज्य सरकारचे जे काही सहकार्य आ. काळे यांना लागेल ते त्यांच्या मागे खंबीरपणे उभे करून त्यांच्या सर्व योजना पूर्ण करणार असल्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, कोरोना महामारीने आरोग्य व्यवस्था किती तोकड्या होत्या. हे सिद्ध झाल्यामुळे मतदारसंघाची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर भर दिला. मतदारसंघात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे आवर्तनाची गरज भासत आहे. त्यासाठी पालकमंत्री ना. विखेंकडे मागणी केल्यामुळे लवकर आवर्तन देण्याचा त्यांनी शब्द दिला आहे.
निवडून आल्यापासून कोपरगाव मतदारसंघात एमआयडीसी व्हावी, यासाठी पाठपुरावा करीत होतो. त्या पाठपुराव्याला पालकमंत्री ना. विखे पाटलांचा रेटा मिळाल्यामुळे सोनेवाडी, चांदेकसारे भागातील शेती महामंडळाच्या जागेत
एमआयडीसी उभारण्याचा निर्णय महायुती शासनाने घेतला आहे. कोपरगाव, शिर्डीचा अत्यंत महत्वाचा एमआयडीसीचा प्रश्न ना. विखे यांच्यामुळे मार्गी लागला आहे.