आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे – आमदार मोनिका राजळे

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मतदारसंघात विकासकामासाठी मोठा निधी मिळत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टीवर लोकांनी विश्वास दाखवून भरघोस असे मतदान दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे व खा. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून आपल्या मतदार संघात चांगल्या प्रमाणात निधी मिळवण्यास मदत होते.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपल्याला चांगली कामगिरी करून दाखवायची आहे. पुढील वर्ष हे पूर्ण निवडणुकीचे असून, त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

तालुक्यातील माणिकमाणिकदौंडी परिसरातील चेकेवाडी येथील सभामंडप बांधणे, चेकेवाडी-धनगरवाडी हरीचा तांडा रस्ता डांबरीकरण करणे, धनगरवाडी ते मच्छिद्रनाथ गड रस्ता डांबरीकरण करणे, आल्हणवाडी येथील गव्हाणे औटी वस्ती रस्ता डांबरीकरण करणे, माकिणदौंडी ते लांडकवाडी रस्ता डांबरीकरण करणे, जिल्हा परिषद अंतर्गत जोक्सनतांडा ते भापकरवाडी रस्ता डांबरीकरण करणे,

बोरसेवाडी ते बाबा बोरसे वस्ती रस्ता करणे, आमदार विकास निधी अंतर्गत कोठेवाडी येथे सभामंडप बांधणे, शिंदेवाडी येथील शेंबडेवस्ती ते नन्नवरे- भिताडेवस्ती रस्ता खडीकरण करणे, जाटदेवळा अंतर्गत गणेशगड ते नाकाडेवाडी रस्ता दुरुस्ती करणे, या चार कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आ. राजळे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाट, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील ओव्हाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण पालवे, शायद पठाण, समीर पठाण, आलमगीर पठाण, सोपान बोरसे, राजेंद्र बोरसे, मच्छिद्र देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे,

रावसाहेब मोरे, अशोक गाडे, शिवनाथ मोरे, मनिषा कर्डिले, राधाकिसन कर्डिले, प्रल्हाद कर्डिले, परमेश्वर गव्हाणे, मिठू चितळे, रंगनाथ महाराज चितळे, बबन चितळे, अजिनाथ गाडे, पांडुरंग जिवडे, पोपट चेके, विजय राठोड, शाहीनाथ सोनाळे, शिवाजी जाधव, सुभाष बोरसे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe