राज्यातील दोन्ही बाजूचे मेळावे बंद झाले पाहीजेत – दिपक केसरकर

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : कर्नाटक तेलंगणा मध्ये ईव्हीएम मशीन नव्हते का ? असा सवाल उपस्थित करत नाचता येईना आंगन वाकडं अशा शब्दात मंत्री दिपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाना साधला असून

तो विजय तुम्हाला चालतो मग भाजपा जिकंले की तिथे ईव्हीएम मशीन दिसते. हे भित्या पोटी ब्रम्ह राक्षस, असे झाले असल्याचे स्पष्ट मत शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी शिर्डीत व्यक्त केले.

साईभक्त तथा राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी बुधवारी साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधला असता ते म्हणाले की,

ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. तरीही आंदोलने का केली जातात? दबाव निर्माण करण्यासाठी आंदोलने केली जात आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला

राज्यातील दोन्ही बाजूचे मेळावे बंद झाले पाहीजेत. आम्ही मंत्री छगन भुजबळांची बाजू घेत नाहीये. भुजबळ जे बोलतात ते ही आम्हाला मान्य नाही आणि जरांगे पाटील जे बोलतात ते ही मान्य नसल्याचे स्पष्ट मत मंत्री दिपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

मराठा समाजाला स्वंतत्र आरक्षण आमच्या सरकारला द्यायचे आहे आणि ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता दिले जाईल. आदानी तुमच्याकडे आले की चालतात दुसरीकडे गेले की चालत नाही, धारावी मधील लोकांकडे आस्थेने बघा, त्यांना जो कुणी घर देईल ते पुण्याचं काम आहे, असे मंत्री केसरकर म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe