पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या संदर्भातील मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली आहे.

त्यानुसार पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी १८, तर आठवीच्या विद्यार्थ्यांना २१ गुण मिळवावे लागणार आहेत.

विद्यार्थी वार्षिक परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला दोन महिन्यांच्या आता पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल. पुनर्परीक्षेतही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गात ठेवले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासूनच होणार आहे.

शिक्षण हक्क कायद्यात बदल करण्यात आला असून, आता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही, ही संकल्पना बदलण्यात आली आहे. इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रत्येक विषयाची परीक्षा घेऊन परीक्षा अखेरीस प्रत्येक विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादन त्यांनी प्राप्त केले आहे किंवा नाही,

याची खात्री केली जाणार आहे. विद्यार्थी वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुनर्परीक्षेची संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लावणे आणि पुढील शैक्षणिक आव्हानांना व स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयार करणे या उद्देशाने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

पाचवीच्या विद्यार्थ्यांची १० गुणांची प्रात्यक्षिक / तोंडी परीक्षा, तर ४० गुणांची लेखी परीक्षा अशी एकूण ५० गुणांची परीक्षा घेतली जाईल. तर आठवीच्या विद्यार्थ्यांची १० गुणांची प्रात्यक्षिक/ तोंडी परीक्षा आणि ५० गुणांची लेखी, अशी एकूण ६० गुणांची परीक्षा घेतली जाईल.

पाचवीच्या वार्षिक परीक्षेत प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांचा समावेश असेल. तर आठवीच्या वार्षिक परीक्षेत प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

वार्षिक परीक्षा साधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा स्तरावर घेतली जाईल. या विद्यार्थ्यांचा निकाल इतर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबर जाहीर केला जाईल.

विद्यार्थी वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास दोन महिन्यांनी त्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल. त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल. मात्र नापास झाल्यास त्याच वर्गात ठेवले जाईल.

प्रभावी अंमलबजावणीसाठी समिती

पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक (एससीईआरटीई) हे अध्यक्ष असतील.

तसेच प्राथमिक संचालक, माध्यमिक संचालक, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, बालभारतीचे संचालक, परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, एक शिक्षणतज्ज्ञ हे सदस्य म्हणून काम पाहतील. एससीईआरटीईचे उपसंचालक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe