Reliance Jio Recharge Plan : भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांना एक मोठी खुशखबर दिली आहे. जर तुम्हीही रिलायन्स जिओचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी राहणार आहे. खरे तर, अलीकडे मोबाईल रिचार्ज खूपच महाग झाले आहेत. पण आता महागड्या रिचार्ज प्लॅन मधून तुमची सुटका होणार आहे.
कारण की, Jio ने एक नवीन आणि स्वस्त प्लॅन लाँच केला आहे. यामुळे तुम्ही जर Jio चे यूजर असाल तर तुमच्यासाठी हा प्लॅन खूपच फायदेशीर ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स जिओने नुकताच एक 75 रुपयांचा नवीन रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. दरम्यान आता आपण जिओच्या या प्लॅनबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कसा आहे 75 रुपयाचा नवीन प्लॅन
Jio ने लाँच केलेला हा नवीन प्लॅन अशा लोकांसाठी फायद्याचा राहील ज्यांना फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज करायचा असतो. जर तुम्ही इंटरनेटसाठी वायफाय घेतला असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी उपयोगाचा राहील. पण तुम्ही नेटसाठी प्लॅन शोधत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी अयोग्य असेल. आता आपण प्लॅन समजून घेऊया. या प्लॅनमध्ये यूजरला 23 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. यामध्ये तुम्हाला दररोज 0.1 एमबी डेटा आणि अतिरिक्त 200 एमबी डेटा मिळेल.
यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा मिळेल, अन 50 मोफत SMS चा लाभ देखील मिळणार आहे. पण सर्वच Jio ग्राहक या रिचार्ज प्लॅनचा लाभ घेऊ शकत नाहीत. या प्लॅन सारखाच आणखी एक प्लॅन रिलायन्स जिओने लॉन्च केला आहे. Jio ने 91 रुपयांचा रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. यामध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता दिली जाईल आणि दररोज ०.१ एमबी डेटाही दिला जाईल. यासोबत 200 MB अधिक डेटा दिला जाईल.
या प्लॅनमध्ये एकूण 3 जीबी डेटा दिला जाईल. यासोबतच तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. तसेच तुम्हाला ५० एसएमएस मोफत पाठवता येतील. निश्चितच जिओचे हे स्वस्त रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. तथापि ज्यांचा इंटरनेटचा वापर अधिक आहे त्यांना कंपनीचे रेगुलर प्लॅनच परवडणार आहेत.