Ahmednagar News : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोघा आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. अथर्व अनिल चौधरी (रा. कोहकडी, ता. पारनेर) व अक्षय उर्फ काळ्या नानासाहेब काळे (रा. निमोन, ता. शिरुर, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नोव आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सदरील आरोपी बेलवंडी फाटा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त होताच सापळा रचून त्यांना गजाआड करण्यात आले. दोन्ही आरोपींना श्रीगोंदा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९५ गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आले.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. दिनेश आहेर, सपोनि. हेमंत थोरात, पोना. रविंद्र कर्डिले, फुरकान शेख, पोकॉ. रोहित मिसाळ, सागर ससाणे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.