शासनाने निर्णय मागे घेतला नाही, तर कांदा लिलाव बंद पाडू !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion News : केंद्र शासनाने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी देवीभोयरे फाट्यावर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून रास्ता रोको आंदोलन केले.

केंद्र शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार निर्णय घेतला आहे. स्थानिक बाजार पेठेमधील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा निर्यात बंदीचे हत्यार उपसले आहे. आता ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार असल्याचे परिपत्रक दि. ८ डिसेंबर रोजी काढण्यात आले आहे.

या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. जर शासनाने निर्णय मागे घेतला नाही, तर पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद पाडू, असा इशारा शेतकरी नेते शिवाजी राव औटी यांनी दिला आहे.

आंदोलनात पारनेर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी सरपंच निलेश केदारी, माजी सरपंच ठकाराम लंके, किसनराव चौधरी, तुळशीराम करकंडे, शिवाजी आप्पा मोरे, अनिल गंधाक्ते, भाऊसाहेब जगदाळे,

कष्णाजी जगदाळे, पोपटराव शेटे, तुळशीराम करकंडे, ज्ञानदेव पानसरे, हनुमंत खणकर, बी आर जगदाळे, शिवाजी बेलोटे, पंढरीनाथ दिघे, बबनराव दिघे, हरभाऊ चौधरी, पांडुरंग गंधाकते, संभाजी मोरे आदी सहभागी झाले होते.

या वेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या निर्णयाचा निषेध करत आक्रमक पवित्रा घेतला होता. या वेळी तहसीलदार गायत्री सौंदाणे यांचे प्रतिनिधी म्हणून वडझिरे महसूल मंडल अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले यांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात आले. याप्रसंगी पारनेर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.