डॉ. सुजय विखे वाटणार दोन लाख किलो साखर, लोकसभेसाठी सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी फंडा !

Sujay Vikhe

आगामी लोकसभा निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या अनुषंगानं सर्वच इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. यात खा. सुजय विखे पाटीलपल्या शैलीत मतदारांशी कनेक्ट होण्यासाठी विविध फंडे वापरत आहेत.

याचाच एक भाग म्हणून त्यांनी साखरपेरणी करायला सुरतवात केली आहे. अगदी तळागातील सामान्य जनतेशी कनेक्ट होण्यासाठी त्यांनी जामखेड तालुक्यात दोन लाख १२ हजार ५०० किलो साखर मोफत वाटणार आहेत.

प्रत्येकी पाच किलो साखर वाटप

लोकसभेसाठी आता तळागाळातील जनतेशी संपर्कात जाणे व कनेक्ट होणे गरजेचे आहे. यासाठी इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. विखे पाटील देखील आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यात तब्बल दोन लाख १२ हजार ५०० किलो साखर मोफत वाटणार आहेत.

या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक रेशनकार्डधारकास साखर देण्यात येणार आहेत. पिवळे, केसरीसोबतच पांढरे आणि एपीएल रेशनकार्डधारकांना पाच किलो साखर वाटण्यात येईल.

जामखेड तालुक्यात किती आहेत रेशनकार्डधारक ?

पिवळे रेशनकार्डधारक – २७ हजार
केसरी रेशनकार्ड धारक – ५ हजार ५००
पांढरे रेशनकार्डधारक – ६ हजार
एपीएल रेशनकार्डधारक – ४ हजार
एकूण ४२ हजार ५०० रेशनकार्डधारक

विक्रम राठोड यांची टीका मनावर घेतली?

खा. सुजय विखे यांनी शिर्डीत साखर वाटली होती. यावेळी विरोधकांनी त्यावर प्रचंड टीका केली होती. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे प्रदेश उपप्रमुख विक्रम राठोड यांनी म्हटलं होत की, उत्तरेची दिवाळी गोड करत असताना दक्षिणेची दिवाळी कडू करत आहेत.

नगर दक्षिण निवडणुकीत विजयी झालेले खा. सुजय विखे हे नगर उत्तरेत शिर्डी लोकसभा मतदारसंघात साखर वाटत फिरत असून प्रत्यक्षात त्यांनी नगर दक्षिणेत साखर वाटणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे आता विरोधकांची टीका खा. विखे यांनी मनावर घेतली आहे का? अशीही चर्चा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe