चीनच्या कुनमिंगमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात डॉक्टरांनी एका महिलेच्या डोळ्यातून तब्बल ६० जिवंत जंत बाहेर काढले आहेत. महिला तिच्या डोळ्यांना खाज सुटल्यानंतर रुग्णालयात गेली होती, जिथे तिला कळले की, तिला जंताचा संसर्ग झाला आहे.
काही वेळाने तर आधीच हादरून गेलेल्या महिलेच्या पापण्या आणि डोळ्यांच्या बुबुळांमधील जागेत जंत रेंगाळत असल्याचे आढळून आले. हेल्थकेअरमधील डॉक्टर्स व तज्ज्ञांनासुद्धा हा प्रकार पाहून धक्का बसला.

डॉक्टरांनी तत्काळ या महिलेवर उपचार सुरू करून तिला रुग्णालयात अॅडमिट करून घेतले आणि तिच्या डोळ्यातील जंत काढण्याची प्रक्रिया सुरू केली. ‘या महिलेच्या डोळ्यात ६० जंत होते आणि ही एक दुर्मीळ घटना असल्याचे डॉ. गुआन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
राऊंडवर्क्सची लागण झाल्याने या महिलेच्या डोळ्यात खाज सुटली होती. दरम्यान, डॉक्टरांच्या अंदाजानुसार, या महिलेला तिच्या आसपासच्या प्राण्यांपासून हा संसर्ग झाल्याचा संशय आहे. या आधारावर, तिला स्वच्छता राखण्यास सांगितले आहे.
विशेष म्हणजे पाळीव प्राण्यांशी संपर्क आल्यानंतर हात-पाय, चेहरा स्वच्छ धुणे आवश्यक असल्याचेही यावेळी डॉक्टरांनी तिला सांगितले आहे. कुत्रे आणि मांजरापासून आपल्याला संसर्ग होण्याची शक्यता असल्याचे महिलेने सांगितले.
त्यांच्या अंगावर अशा प्रकारचे संसर्गजन्य जंत असू शकतात. तिला वाटते की तिने प्राण्यांना स्पर्श केला असेल आणि नंतर लगेचच तिचे डोळे चोळले असतील. तुम्हीही असे करत असाल तर ते टाळावे.