Rahu Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि कुंडलीला विशेष महत्व आहे. ग्रहांच्या हालचालींचा प्रत्येक राशीच्या लोकांवर चांगला आणि वाईट असा प्रभाव दिसून येतो, नऊ ग्रहांपैकी प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्व आहे, त्यातच राहूला देखील विशेष महत्त्व दिले गेले आहे. राहू हा मायावी ग्रह मानला जातो. राहू कोणत्याही ग्रहासोबत असला तरी त्याची ऊर्जा वाढते. ज्याला राहूचा आशीर्वाद असतो त्याला नशीब साथ देते. तसेच त्याचे चांगले दिवस सुरु होतात.
ज्या लोकांवर राहूचा आशीर्वाद आहे, त्यांना राजकारणाशी संबंधित कामात फायदा होतो. राहू माणसाच्या कर्माच्या आधारे फळ देतो. हा ग्रह 2024 मध्ये आपली राशी बदलणार नाही. वर्षभर मीन राशीत संक्रमण होत राहील. तर केतू कन्या राशीत राहील. याशिवाय राहू गुरुसोबत त्रिएकदश योगही तयार करेल. येत्या वर्षात काही राशींवर राहूची विशेष कृपा असेल. त्यामुळे पदोन्नती आणि आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. सुख-समृद्धीमध्ये वाढ होईल. कोणत्या त्या राशी ज्यांच्यावर राहू कृपा असेल चला पाहूया…
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी येणारे वर्ष खूप खास असेल. मीन राशीतील राहूचे भ्रमण या लोकांसाठी खूप शुभ राहील. या काळात उत्पन्न वाढेल. करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगली बातमी ऐकू येईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. पदोन्नतीची शक्यता आहे. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. वैवाहिक जीवनातील समस्या संपतील.
तूळ
मीन राशीतील राहूचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानले जात आहे. या काळात तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ होईल. नवीन वाहन आणि मालमत्ता खरेदीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. ज्यामुळे प्रगती होईल. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल.
मेष
राहु ग्रहामुळे मेष राशीच्या लोकांसाठी येणारे वर्ष देखील शुभ राहील. राशीच्या लोकांच्या कुंडलीत यश मिळण्याची शक्यता आहे. तब्येतही सुधारेल. जीवनशैलीत बदल दिसून येतील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आर्थिक लाभ आणि पदोन्नतीची शक्यता आहे. एकूणच येणारे वर्ष चांगले सिद्ध होईल.