Maharashtra News : शेतकऱ्यांसाठी शासनाने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरु केली होती. या योजनेमध्ये अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. आता याची व्याप्ती वाढवली गेली आहे.
आता जर शेतकऱ्याच्या पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाला तर शासनाकडून गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत शेतकरी पतीला दोन लाखांचा विमा मिळणार आहे.
कधी मिळते गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेद्वारे मदत?
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा सध्या चांगला प्रसार झाला आहे. परंतु अद्यापहि अनेकांना या योजनेत कोणत्या अपघातात मृत्यू झाल्यास मदत मिळते हे माहित नसावे. त्यामुळे प्रस्तावसंख्या तशी कमी आहे. या अपघातांमध्ये पाण्यात बुडून,
अपघाती विषबाधा, वीज पडून, विजेचा धक्का बसून, सर्पदंश, विंचूदंश, उंचावरून पडल्याने, जनावरांच्या हल्ल्यात व जनावर चावल्याने मृत्यू किंवा जखमी झाल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून मदत मिळण्यास पात्र आहेत.
आता या मध्ये बाळंतपणातील महिलेच्या मृत्यूचाही समावेश केला असल्याने त्याचा फायदा साहजिकच शेतकरी कुटुंबांना होईल.
शासनाचे उद्दात धोरण
दंगलीत शेतकऱ्यांचा नाहक खून झाला किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आले तर गोपीनाथ मुंडे योजनेस पात्र ठरून आर्थिक मदत देता येते. याशिवायचं बाळंतपणात एखाद्या शेतकरी कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाल्यास
पतीलाही दोन लाख रुपये देण्याची तरतूद शासनाने केली आहे. यामागे शेतकरी कुटुंबाला मदत मिळावी, घरातील करता पुरुष गेल्यास कुटुंबाची हाल अपेष्टा होऊ नये यासाठी आर्थिक तरतूद होईल हा शासनाचा उद्दात हेतू यामागे असावा.
अपंगत्व आल्यासही मिळणार पैसे
शेतकरी कुटुंबातील व्यक्त्तिंचा वेगवेगळ्या कारणामुळे अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाख रुपये तर मिळतातच. परंतु जर अपंगत्व आले तर एक लाख रुपयांची मदत रोख स्वरुपात मिळते
अशी माहिती अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे. यात आता बाळंतपणात व दंगलीत मृत्यू झाला तरी विमा कंपनीकडून वारसांना पैसे देण्याची तरतूद केली असल्याचेही ते म्हणाले.