महाराष्ट्रात व्यवसाय करत असलेल्या प्रत्येक आस्थापनांची नामफलक हे मराठी देवनागरी लिपी मध्ये असावं हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. परंतु आदेशानंतरही बऱ्याच दुकानदारांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
या पार्श्वभुमीवर न्यायालयाचा आदेश पाळून आपण तात्काळ ८ दिवसांच्या आत आपल्या आस्थापनेचे नाव मराठी भाषेत करून घ्यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन हातात घेतले जाईल. असे पत्र आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अहमदनगर शहरातील बाजारपेठेतील दुकानदारांना दिला आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/12/ahmednagarlive24-Ahmednagarlive24-72.jpg)
१६ वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीत पाट्या हव्यात असे सांगून महाराष्ट्रात मराठी पाट्यांसाठी रान उठविले होते. त्यानंतर महाराष्ट्रातही अनेकांनी आपल्या आस्थापनांच्या पाट्या मराठीत केल्या होत्या.
त्यानंतर मराठी पाट्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी होऊन महाराष्ट्रात व्यवसाय करत असलेल्या प्रत्येक आस्थापनांची नामफलक हे मराठी देवनागरी लिपी मध्ये असावं हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.
परंतु आदेशानंतरही बऱ्याच दुकानदारांकडून दुर्लक्ष होत असल्याने मनसेकडून मराठी पाट्यांसाठी व्यावसायिकांना पत्राची मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र हा मराठी माणसांचा गड आहे. इथे मराठी ला दुय्यम स्थान महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र भयमांत अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करून आता मराठी नामफलकावर सर्वोच्च न्यायालयाने आदेश काढला आहे.
आता हा विषय राजकीय राहीलेला नाही आता न्यायालयाचा आदेश पाळून आपण तात्काळ ८ दिवसांच्या आत आपल्या आस्थापनेचे नाव मराठी भाषेत करून घ्यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन हातात घेतले जाईल. असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अहमदनगर शहरातील बाजारपेठेतील इंग्रजी भाषेत पाट्या असलेल्या व्यावसायिकांना दिले आहे.
व्यावसायिकांनी ८ दिवसांत इतर भाषेतील पाट्या बदलून मराठी भाषेत लावाव्यात अन्यथा आठ दिवसांनंतर मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल. असा इशारा मनविसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटक परेश पुरोहित यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हा संघटक परेश पुरोहित, जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, अनिकेत शियाळ, प्रविण गायकवाड, तेजस भिंगारे, अंबरनाथ भालसिंग, योगेश चेंगेडिया आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.