चिचोंडी पाटील : सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड या महामार्गासाठी नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावातील १०८ शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत. मात्र प्रत्यक्षात जेव्हा बाधित क्षेत्रामध्ये सर्व विभागाकडून मालमत्तेच्या नोंदी घेण्यात आल्या तेंव्हा शेतकऱ्यांची जी मालमत्ता होती, ती भूसंपादन उपजिल्हाधिकारी कार्यालय यांनी दाखविलेल्या नोंदीमध्ये प्रचंड तफावत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे चुकीच्या नोंदी दुरूस्तीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतकडून दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या नोटीसीव्दारे शेतकऱ्यांना व ग्रामपंचायतला समजले सदर नोटीसीव्दारे बाधित शेतकऱ्यांना सुनावणीसाठी दि.२०/११/२०२३ ते ०१ / १२ / २०२३ दरम्यान टप्याटप्याने बोलावण्यात आले.
यावेळी संपादित होणा या क्षेत्रात सर्व विभागांकडून झालेला संयुक्त मोजणी अहवाल वाचून दाखवला नाही व प्रतही ग्रामपंचायत व शेतकऱ्यांना दिली नाही. बाधित शेतकऱ्यांनी मागणी केल्यावर दि.६/ १२/२०२३ रोजी शेतकऱ्यांना संयुक्त मोजणी अहवालातील मालमत्तेच्या नोंदी तोंडी वाचून दाखवण्यात आल्या, सदर नोंदीमध्ये प्रचंड तफावत दिसून आली.
या बाबत शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतकडे तकारी केल्या आहेत. दिनांक ०६/ १२/२०२३ रोजी संयुक्त मोजणी अहवालातील नोंदी तोडी वाचून दाखविल्यावर मालमत्तेच्या आंबा पेरू चिक्कू, डाळींब, पाईप लाईन, ठिबक सिंचन, कांदा चाळ, विहीर, बोअर वेल, बांधकाम, घरे,
गाय गोठा, इतर चुकीच्या नोंदी घेतल्याचे शेतकऱ्यांना दिसून आले. प्रत्यक्षात जेव्हा बाधित क्षेत्रामध्ये सर्व विभागाकडून मालमत्तेच्या नोंदी घेण्यात आल्या तेंव्हा शेतकऱ्यांची जी मालमत्ता होती, ती भूसंपादन उपजिल्हाधिकारी कार्यालय यांनी दाखविलेल्या नोंदीमध्ये प्रचंड तफावत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तरी संयुक्त मोजणी अहवालात झालेल्या चुकाची शेतात फेर सर्वेक्षण करून दुरूस्ती करण्यात यावी. व बाधित क्षेत्रात संयुक्त मोजणी सर्वेक्षण करतेवेळीच्या नोंदी अहवालात घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.