Business Idea : डिझेलच्या झाडांची शेती करा व लाखो रुपये कमवा, जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:
Business Idea

Business Idea : तुम्ही सध्या बेरोजगार आहात? नोकरी शोधण्यासाठी इतरत्र फिरत आहात? आहे त्या नोकरीत तुमचे आर्थिक गरजा भागत नाहीत? तर मग ही तुमच्यासाठी खास बातमी आहे. येथे आम्ही तुम्हाला एक खास बिझनेस आयडीआय सांगणार आहोत. याद्वारे तुम्ही हजारो रुपये कमावू शकता.

ही बिझनेस आयडिया शेती संबंधित आहे व बिझनेस आयडिया आहे ‘डिझेलच्या झाडांची’ लागवड. डिझेलचे झाड लावून तुम्ही हजारो रुपये कमावू शकता. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात

बायोडिझेलचा स्रोत

सध्या अनेक लोक पारंपारिक शेती सोडून नगदी पिकांना पसंती देत ​​आहेत. डिझेलचे झाडंही त्यातीलच एक. याला जेट्रोफा किंवा रतनजोत असे म्हटले जाते. या वनस्पतींमधून बायोडिझेल मिळत असल्याने याला सामान्य भाषेत डिझेलचे झाड असेच म्हटले जाते. याचे वैशिष्ट्य म्हणजे ओसाड जमिनीत,वर्षभरात केव्हाही याची लागवड करता येते. बियाणेही बाजारात सहज उपलब्ध होत असून या रोपाला जास्त पाणी आणि मेहनतीची गरज लागत नाही.

काय आहे नेमके हे झाड? कसे मिळते डिझेल? पहा..

जेट्रोफा एक झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीच्या बियांपासून 25 ते 30 टक्के तेल काढता येते. या बायोडीझलवर वाहने चालवता येतात. तेल काढल्यानंतर उरलेल्या अवशेषातून वीजनिर्मितीही करता येते. एकदा लागवड केल्यास पाच वर्षे या पासून बी मिळते. बियांपासून डिझेल बनवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. यासाठी प्रथम झाडाच्या बिया फळांपासून वेगळ्या केल्या जातात. त्या मशीनमध्ये टाकून तेल काढले जाते.

यातून किती पैसे कमाऊ शकता ?

सध्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे याची डिमांड वाढली आहे. शासनही या पिकाच्या लागवडीसाठी खूप मदत करत आहे. एका रिपोर्ट्सनुसार, एक हेक्टर जमिनीवर सरासरी 8 ते 10 क्विंटल बियाणे तुम्ही काढू शकता. बाजारात ते 1800 ते 2500 रुपये प्रतिक्विंटल दराने विकले जाते. जर जास्त प्रमाणात याची लागवड केली तर यातून मोठा नफा तुम्ही कमावू शकता

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe